ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून स्वतंत्र देश आपल्या स्वाधीन केला. नव्या पिढीला स्वतंत्र देश भेट म्हणून दिला. असे आपले स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्यावर आधारीत हे आहेत काही चित्रपट जे एकदा तरी आपण नक्की पहावेत.
मंगल पांडे: द रायझिंग
स्वातंत्र्य लढ्याचे नायक मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित ‘मंगल पांडे: द रायझिंग’ हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतना मेहता यांनी केले होते. मंगल पांडेचे पात्र आमिर खानने पडद्यावर जिवंत आणि खूप उत्कृष्टरित्या साकारले होते.
द लिजेंड ऑफ भगतसिंग
द लिजेंड ऑफ भगतसिंग हा चित्रपट भारतीय क्रांतिकारक आणि लोकनायक भगतसिंग यांच्यावर आधारित आहे. दिल्लीतील मध्यवर्ती विधानसभेच्या प्रतिकात्मक बॉम्बस्फोटासाठी ते ओळखले जातात, ज्यासाठी त्यांला अटक करून फाशी देण्यात आली होती. राजकुमार संतोषी दिग्दर्शित, द लीजेंड ऑफ भगतसिंग या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले. अजय देवगण, सुशांत सिंग आणि डी. संतोष यात मुख्य भूमिकेत होते.
नेताजी सुभाष चंद्र बोस- द फॉरगोटन हीरो
दिग्गज श्याम बेनेगल यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या जीवनावर चित्रपट प्रकाश टाकतो. चित्रपटात नेताजींची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयरा खान हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत खेळली अनाेखा गेम, व्हिडिओ पाहून युजर्सने केलं ट्राेल
तुनिषा शर्माच्या आईने केला मालमत्तेचा खुलासा; म्हणाली, ‘भाड्याच्या घरात राहते…’