Tuesday, July 9, 2024

वास्तविक जीवनातील शास्त्रज्ञांवर आधारित आहेत ‘हे दोन’ चित्रपट

चित्रपटांच्या सर्वात आकर्षक शैलींपैकी एक म्हणजे बायोपिक, आणि शास्त्रज्ञांबद्दलचे चित्रपट दाखवतात की प्रत्येक मोठ्या शोधाची एक पार्श्वकथा असते. पाहुयात असे दोन चित्रपट जे वास्तविक जीवनातील शास्त्रज्ञांवर आधारित आहेत. 

रॉकेटरी
या चित्रपटाला भारतीय जेष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायणन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट म्हणता येईल. प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन यानं या सिनेमात डॉ. नम्बी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शनाची धुराही सांभाळलीय. गुप्तहेर असल्याचा खोटा आरोप लावल्यानंतर 1994 मध्ये नम्बी नारायणन यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले. पण हे सगळे आरोप खोटे असल्याचं आता सिद्ध झालं आहे. एकंदरीत,रॉकेटरी हा चित्रपट पाहणे वेगळा अनुभव ठरेन.

मिशन मंगल
२०१३ मध्ये लॉन्च झालेल्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या मंगळयानची उल्लेखनीय कथा ‘मिशन मंगल’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू या कलाकारांचा समावेश आहे आणि हा सिनेमा भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथील शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित आहे. जिने भारताच्या पहिल्या आंतरग्रहीय मोहिमेच्या मार्स ऑर्बिटर मिशनमध्ये योगदान दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
म्हणून बदललं होतं दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी स्वतःचं खानदानी नाव!
अमोल मिटकरींनी साधला बीजेपीवर निशाना; म्हणाले,’राज्याला उर्फीमध्ये अडकवून….’

 

हे देखील वाचा