भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी अलीकडेच ब्रिटनमधील सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. महत्वाचे म्हणजे ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत, दुसरे की ते हिंदू आहेत आणि तिसरे म्हणजे त्यांचे सासरे देखील भारतात आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता त्यांची पत्नी आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्यापासून त्यांना जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. ते ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांमध्ये विशेषत: उत्साह आहे. या दरम्यान, सोशल मीडिया युजर्सने ऋषी यांच्या बायोपिकवर चर्चा करण्यास सुरुवात केली आणि ऋषी यांची भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना सल्ला देण्यास सुरुवात केली. यावर लोकांची क्रिएटिविटी समोर येत असून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
यावेळी, अक्षय कुमार (akshay kumar) आणि कॅटरिना कॅफ (katrina kaif) हिच्या ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाची एक क्लिप सोशल मीडियावर जाेरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कलाकार भारताच्या सभ्यतेबद्दल सांगताना दिसत आहेत. ऋषी सुनकच्या बायोपिकसाठी अक्षय कुमार परफेक्ट अभिनेता आहे. असे अनेक युजर्सचे म्हणणे आहे.
Akshay Kumar auditioning to play Rishi Sunak in his biopic. pic.twitter.com/kuZznisRu1
— Yo Yo Funny Singh ???????? (@moronhumor) October 24, 2022
केवळ अक्षय कुमारच नाही तर अनेक सोशल मीडिया युजर्सनी ऋषी सुनकच्या भूमिकेसाठी जिम सरभला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून संबोधले आहे.
त्याचबरोबर ऋषी सुनक यांच्या बायोपिकसाठी अनेकजण सिद्धार्थ मल्होत्राचे नाव सुचवत आहेत.
ही बाब तर बॉलीवूड कलाकारांची आहे, क्रिकेटर आशिष नेहरालाही कास्ट केले जाऊ शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
अमिताभ आणि अनुपम यांनी केला आनंद व्यक्त
ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्याची बातमी 25 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी या बातमीवर ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. अनुपम खेर यांनीही भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिनेसृष्टीतील ‘हे’ बहीण- भाऊ एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव, पाहा भन्नाट फाेटाे
कनिकाने ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांची घेतली भेट, साेशल मीडियावर असा व्यक्त केला आनंद