Sunday, June 8, 2025
Home अन्य भोपाळ वनविभागात दगडफेक केल्यामुळे भडकली रवीना टंडन, व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

भोपाळ वनविभागात दगडफेक केल्यामुळे भडकली रवीना टंडन, व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने 90 च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकावंर राज्य केले आहे. रवीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. मात्र, सध्या अभिनेत्रीने भोपालमधील एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या चित्रपटापेक्षा जास्त आपल्या वक्तव्यामुळे ओळखली जाते. ती नुकतंच शुटिंगसाठी भोपाळ शहरात गेली असून त्या ठिकानचा एक व्हिडिओ शेअर करत तिने भोपाळमधील वन विहारातील बागांची सुरक्षा न केल्यामुळे व्हिडिओच्या माध्यामातून नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या मते काही आघाव आणि निर्दयी लोकं वन विभागातील पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या बागांवर दगडफेक करत त्यांचा अपमान करत आहेत.

रवीना टंडन आपल्या आगामी येणाऱ्या चित्रपाटच्या शुटिंगसाठी भोपाळमध्ये गेली असून तिने सोमवरा (दि, 21 नोव्हेंबर) रोजी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंवरुन एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वन विहार, भोपाल। मध्य प्रदेश। पर्यटक (बदमाश) बाघों पर पथराव करते हैं। ऐसा न करने के लिए कहने पर अच्छी हंसी आती है। हंसते हैं, पिंजरे को हिलाते हैं- पथर फेंकते हैं। बाघ के लिए कोई सुरक्षा नहीं। अपमान वे अधीन हैं।” अशाप्रकारे संताप व्यक्त करत अभिनेत्रीने ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी वनविहार येथे पर्यटकांच्या वाहनाखाली येऊन एका कोल्ह्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण लवपण्यासाठी वनविहारच्या कर्मचाऱ्यांनी घाईघाईत त्याचे देह दफन केले, तर नियमानुसार त्याचे पोस्टमॉटम करायचे होते. या प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन सदस्यांमधील चौकशी समिती स्थापन करून आपली जबाबदारी पार पाडली. अशा प्रकारे हे प्रकरन दडपले गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचा कार अपघात, अवघ्या 25 व्या वयातच घेताला अखेरचा श्वास
खुशखबर! अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘भोला’,टीझर झालाय प्रदर्शित

हे देखील वाचा