Monday, June 17, 2024

खुशखबर! अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘भोला’,टीझर झालाय प्रदर्शित

बॉिलवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन सध्या आपल्या ‘दृष्यम 2‘ मुळे खूपच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. आता अभिनेता आपला आगामी येणारा ‘भोला’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. नुकतंच अभिनेत्याने चित्रपटाचे प्रमोशन पोस्टरही प्रदर्शित केले होते.

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन (Ajay Degn) याचा नुकताच ‘दृष्यम 2’ चित्रपट प्रदर्शित झाला असून अभिनेत्याने पुन्हा एका आगामी येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले असून मंगळवार (दि, 22 नोव्हेंबर) रोजी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्याने प्रत्येकांचे लक्ष वेधले आहे. अजय सध्या ‘भोला’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे.

‘भोला’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुरुवात लखनऊ शहराच्या अनाथ आश्रमपासून होते. त्या आश्रमामध्ये ज्योती नावाची एक मुलगी राहात असते. ज्येतिला एक महिला रात्री लवकर झोपण्यास म्हणते, कारण दुसऱ्यादिवशी ज्योतीला कोणीरतरी व्यक्ती भेटायला योणार असते. हे ऐकल्यानंतर ज्योतीला रात्रभर झोप येत नाही, ती विचार करते की, तिला कोण भेटायला येणार आहे. ती सगळ्यांना प्रश्न विचारते की, आज्जी-आजोबा, काका, काकू असे अजून कोणकोणते नाते असतात? मला कोण भेटायला येणार आहे? असे प्रश्न ज्योतीच्या मनात येत असतात.

‘भोला’ चित्रपटाचा टीझर 46 सोकंदाचा असून चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. युट्युबवरील अधिकृत चॅनेलवरुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री तब्बु (Tabbu) आणि अजयची  रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोण आहे ‘हा’ उद्योगपती? ज्याच्या प्रेमात पडली मानुषी छिल्लर
‘कितने आदमी थे’ म्हणणाऱ्या अमजद यांचा ‘अशा’प्रकारे झाला मृत्यू; अखेरच्या वेळेस बिग बींनी दिली होती साथ

हे देखील वाचा