Tuesday, March 5, 2024

‘सेक्स आणि हिंसा…’, ‘अ‍ॅनिमल’च्या रिलीजनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर चांगलेत वर्चस्व गाजवत आहे. नुकताच रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील काही सीन मुळे चाहत्यांमध्ये चर्चेत वातावर निर्माण झाले आहे. काही लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. तर काहीनी याला विरोध केला आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. दरम्यान, आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला लोक या चित्रपटाशी जोडून पाहत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बराच जुना आहे, ज्यामध्ये आमिर खान (Aamir Khan) हिंसाचार आणि चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रौढ दृश्यांवर आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. तो म्हणत आहे की, “काही भावना अशा असतात ज्याद्वारे लोकांना भडकवणे खूप सोपे असते. हिंसा ही त्या भावनांपैकी एक आहे आणि सेक्स ही दुसरी भावना आहे. या दोन भावनांमधून उत्तेजित करणे खूप सोपे आहे. जर दिग्दर्शक फार टॅलेंटेड नसेल अन् त्याला कथा रंगवून मांडता येत नसेल तर चित्रपट चालण्यासाठी तो हिंसा आणि सेक्स या गोष्टींचा आधार घेतो.”

आमिर खान पुढे म्हणतो, “जे दिग्दर्शक कथा बनवण्यात, भावना दाखवण्यात आणि परिस्थिती निर्माण करण्यात प्रतिभावान नसतात, ते त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी हिंसा आणि सेक्सवर खूप अवलंबून असतात. त्याला असे वाटते की जर त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अशा गोष्टी दाखवल्या तर त्याचा चित्रपट यशस्वी होईल.”

आमिर पुढे म्हणतो, “माझ्या मते ही पूर्णपणे चुकीची विचारसरणी आहे. असे करण्यात त्यांना कधी-कधी यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु असे केल्याने समाजाचे मोठे नुकसान होते आणि असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे मला वाटते.” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे आणि तो ‘अ‍ॅनिमल’शी जोडला जात आहे.

जर आपण रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल’बद्दल बोललो तर, चित्रपटाने शुक्रवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह बंपर ओपनिंग केले आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 66.27 कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच केवळ दोन दिवसांत अ‍ॅनिमल’ने भारतात 130 कोटी रुपये जमा केले आहेत. जर आपण जगभरातील कलेक्शनबद्दल बोललो तर, या प्रकरणात चित्रपटाने सुमारे 236 कोटींची कमाई केली आहे. (Mr Perfectionist Aamir Khan video goes viral after the release of Animal)

आधिक वाचा-
‘जलसा’च्या बाहेर चाहत्यांची गर्दी पाहून बिग बी झाले भावूक, पोस्ट शेअर करून व्यक्त केल्या भावना
‘अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंची लूक पाहाच

हे देखील वाचा