Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड आमिर खानचे करिअर ‘हा’ साऊथ सुपरस्टार नेणार यशाच्या शिखरावर, आगामी सिनेमासाठी केली हातमिळवणी?

आमिर खानचे करिअर ‘हा’ साऊथ सुपरस्टार नेणार यशाच्या शिखरावर, आगामी सिनेमासाठी केली हातमिळवणी?

बॉलिवूडमधील ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. आमिर शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर आमिरने घोषणा केली होती की, तो आता सिनेसृष्टीपासून काही काळ ब्रेक घेत आहे. मात्र, त्याच्या या सिनेमाला ओटीटीवर प्रेक्षकांनी चांगले पसंती दर्शवली. कदाचित आता तरी आमिर त्याचा निर्णय बदलेल अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण करतो की, नाही हे येणारा काळच सांगेल. मात्र, सध्या असे वृत्त समोर येत आहे की, आमिर खान ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) याच्यासोबत एका सिनेमात काम करू शकतो.

‘केजीएफ’ फ्रँचायझीचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याबाबत माध्यमांमध्ये असे वृत्त आहे की, आमिर खान आणि ज्युनिअर एनटीआर (Aamir Khan And Jr NTR) हे एक सिनेमा बनवण्याची योजना करत आहेत. ज्युनिअर एनटीआर आणि प्रशांत नील ‘एनटीआर 31’ (NTR 31) नावाच्या एका सिनेमासाठी एकत्र येतील. प्रशांत नील यांनी मे 2022मध्येच या सिनेमाबाबत माहिती दिली होती. या सिनेमाचे एक पोस्टर शेअर करण्यात आले होते, ज्यात ज्युनिअर एनटीआरची एक झलकही पाहायला मिळाली होती. यानंतर सिनेमाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

संपूर्ण भारतात रिलीज होणार सिनेमा
माध्यमांतील वृत्तांनुसार, हा सिनेमा पॅन इंडिया म्हणजेच संपूर्ण भारतात रिलीज होईल. या सिनेमाबाबत आमिरकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, प्रशांत नील यांच्या या सिनेमात आमिर खलनायकाची भूमिका साकारू शकतो.

आमिर खानने तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते. त्याने 2018मध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर तो थेट ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, या सिनेमानंतर ब्रेक घेण्याची घोषणा केल्यानंतर असेही म्हटले होते की, त्याला प्रोडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. आता तो ‘चॅम्पियन्स’ या आगामी सिनेमाची निर्मिती करू शकतो. (mr perfectionist actor aamir khan to collaborate with kgf director prashanth neel and jr ntr)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वय 48, पण फिगर विशीतल्या अभिनेत्रीसारखा; कपूर घराण्याच्या पोरीने वाढवले सोशल मीडियाचे तापमान
‘याची गरुड पुराणात वेगळी शिक्षा आहे’, रानू मंडलचा बाईकवरील रोमँटिक व्हिडिओ पाहून संतापला नेटकरी

हे देखील वाचा