Monday, July 1, 2024

मृणाल ठाकूरच्या मनात यायचा जीव देण्याचा विचार, ट्रेनमधून उडी मारण्याचा आला होता विचार

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अपयश आणि नैराश्याने खचून गेल्याने आत्महत्या केली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केलेल्या आत्महत्येमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या या नवोदित कलाकाराने घेतलेल्या या निर्णयाने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात होती. आता अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही आपल्याला आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता असा धक्कादायक खुलासा केला आहे.

मृणाल ठाकूर (Mrunal thakur) हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मृणाल सोशल मीडियावर ही नेहमी सक्रिय असते. मृणालने आपल्या कॉलेजच्या काळात आलेल्या नैराश्याने आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता असा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना मृणाल म्हणाली की, “कॉलेजच्या काळात ती लोकल ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी ती दारात उभी असायची. प्रवास करताना अनेकदा तिला ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करण्याचे विचार मनात यायचे. मृणालच्या घरच्यांना तिला डॉक्टर बनवायचे होते; मात्र मृणालने मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला होता. हा कोर्स आपल्यासाठी योग्य नाही असा विचार आल्यानंतर मृणाल प्रचंड दुःखात होती. याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की या काळात मुंबईमध्ये राहणे कठीण होते. मात्र मला माझ्या कामावर विश्वास होता.मृणालला आपण अपयशी ठरलो तर आपल्या घरचे लावून देतील अशी भीती वाटायची. तिला लग्न करून संसार करत बसणे मान्य नव्हते त्यासाठी तिला यशस्वी व्हायचे होते. त्यामुळेच ती प्रयत्न करत होती.”

हेही पाहा : प्रेमात असूनही ‘लता मंगेशकर’ का राहिल्या अविवाहित? । Lata Mangeshkar Unsuccessful Love Story

अभिनेत्री मृणाल लवकरच ‘जर्सी’ चित्रपटात झळकणार असून ती सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जर्सी नावाच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन या आधी होणार होते मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही तारीख रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा चित्रपट प्रदर्शनाची दुसरी तारीख दिली गेली नाही. प्रेक्षक सुद्धा या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा