Thursday, April 18, 2024

मराठी मनोरंजनविश्वातील ‘या’ हिट अभिनेत्रींच्या बहिणी देखील आहेत यशस्वी अभिनेत्री जाणून घ्या त्यांची नावे

बॉलिवूडवर अनेकदा नेपोटीझमचे मोठ्या प्रमाणावर आरोप केले जातात. तसे पहिले तर आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त स्टार्स किड्सची चलती आहे. अनेक स्टार किड्स आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. यासोबतच बॉलिवूडमध्ये कपूर घराण्यासारखे काही कुटुंब देखील आहेत, ज्यांचे संपूर्ण खानदान बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. मात्र जसे बॉलिवूडमध्ये आहे, तसे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील पाहायला मिळते. आपण अनेकदा किंबहुना नेहमीच कलाकार आणि त्यांच्या मुलांबद्दल वाचतो, ऐकतो, बघतो. मात्र मराठी इंडस्ट्रीमध्ये बहिणीच्या अशा जोड्या पाहायला मिळतात ज्या मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून, यशस्वी देखील आहेत. आज या लेखातून आपण मराठी मनोरंजनविश्वातील गाजलेल्या बहिणींच्या जोडांबद्दल जाणून घेऊया.

भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते :
वागळे की दुनिया या मालिकेतून एक उत्कृष्ट आई, सासू, आजी, पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या भारती आचरेकर सर्वांनाच माहित असतील. तर वंदना गुप्ते यांनी तर मराठी नाटकं, मालिका, चित्रपट करत त्यांच्यातील प्रतिभावान अभिनेत्रीला सर्वांसमोर आणले आहे. त्यांनी हिंदीमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तुम्हाला माहित आहे का, भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या सख्या बहिणी आहेत.

पौर्णिमा तळवलकर आणि पल्लवी वैद्य :
होणार सून मी ह्या घरची मालिकेतील ‘श्री’ ची बेबी आत्या अर्थात पौर्णिमा तळवलकर आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत पुतळा राणीसाहेबांची भूमिका साकारणारी पल्लवी वैद्य सर्वांनाच माहित आहे. मात्र पौर्णिमा आणि पल्लवी या दोघीही सख्या बहिणी आहेत.

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे :
या दोघी बहिणी तर अनेकदा सोबत दिसत असतात. त्यांचे एकमेकींसोबतचे फोटो बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. मृण्मयीनंतर गौतमीने देखील तिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयात एन्ट्री मारली आणि ती देखील बहिणी सारखी यशस्वी झाली.

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे :
हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या तितिक्षा तावडेने एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले. खुशबूने देखील मराठी मालिका विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते :
भार्गवीने टेलिव्हिजन क्षेत्रात मुख्य अभिनेत्रीपासून तिचा प्रवास सुरु केला. मालिका, चित्रपट गाजवणाऱ्या भार्गवीची बहीण देखील याच क्षेत्रात सक्रिय असून, चैत्रालीने देखील हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा