कोरोनाचा कहर कमी झाला आणि चित्रपटांच्या प्रदर्शनचा सपाटा सुरु झाला आहे. एका मागोमाग एक असे मोठे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. लवकरच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा ‘जर्सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील बरीच काळापासून प्रेक्षकांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे. सिनेमाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांनी दमदार प्रतिसाद दिला. सध्या ‘जर्सी’ या सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याच निमित्ताने शाहिद, मृणाल आणि पंकज कपूर कपिल शर्मा शोमध्ये पोहचले होते.
या भागाचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मृणाल कपिलला सांगते की, ती खूपच वैतागली असून, तिला खूपच राग येत आहे. कारण घरातले काम पण तीच करणार, ऑफिसला पण तीच जाणार यामुळे या शोमध्ये तिचा राग बाहेर आला आहे. तुम्ही विचारत पडला असाल की हे काय चालू आहे. मात्र हे मृणालने तिच्या चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल सांगितले.
‘जर्सी’ सिनेमात शाहिद आणि मृणाल पतिपत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यांच्या जीवनात असंख्य उतार आणि चढाव येतात, मात्र यातच मध्ये काही ट्विस्ट येतात ज्यामुळे दोघांचे आयुष्य बदलायला लागते. मात्र ते ट्विस्ट नक्की काय आहे हे सिनेमा पाहिल्यावरच समजेल. सध्या सोनी चॅनेलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या भागाचा प्रोमो शेअर केला असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कपिल शर्मा शोचा हा भाग खऱ्या अर्थाने हटके ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच शोमध्ये पंकज कपूर आणि शाहिद कपूर ही बाप बेट्याची जोडी दिसणार आहे. त्यामुळे या शोमध्ये हे दोघं एकमेकांचे विविध किस्से आणि गुपितं खोलताना दिसणार आहे. यामध्ये कपिलची टीम शाहिदच्या सुपरहिट अशा कबीरसिंगवर ऍक्ट सादर करताना दिसत असून, प्रोमोमध्ये पंकज कपूर यांचा देखील हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.
शाहिद आणि मृणाल यांचा ‘जर्सी’ हा सिनेमा येत्या १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र १४ एप्रिलला केजीएफ २ प्रदर्शित होत असल्याने हा सिनेमा २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याआधी देखील कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. साऊथ सिनेमाचा रिमेक असलेल्या या सिनेमात पंकज कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










