हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना कधी कधी त्यांच्या शरीरावरून, कपड्यावरून असभ्य भाषेत होणार्या टीकेला सामोरे जावे लागते. नेटकऱ्यांच्या या असभ्य भाषेला काही अभिनेत्री त्यांच्याच भाषेत उत्तर देताना दिसतात. अशाच ट्रोलिंगचा सामना अभिनेत्री मृणाल ठाकूरला करावा लागला होता. मात्र तिने त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. सध्या तिच्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal thakur) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यावरुन ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मृणाल तिच्या फिटनेस मुळेसुद्धा प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी तिने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. यामध्ये ती व्यायाम करताना दिसत होती. याच व्हायरल व्हिडिओवर काही लोकांनी तिच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. या व्हिडिओमध्ये ती रिंगमध्ये किक बॉक्सिंग करताना करताना दिसत होती. यावर काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या होत्या. यामध्ये एका युजरने “मटक्या सारखा पार्श्वभाग आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर मृणालनेही गांधीगिरी स्टाइलमध्ये “धन्यवाद दादा” असे उत्तर दिले होते. तर आणखी एकाने “तुम्हाला तुमचे खालचे वजन कमी करावे लागेल खूप मोठे दिसते” अशी अभद्र प्रतिक्रिया दिली होती. यावर ही मृणालने सभ्य भाषेत त्याला उत्तर दिले होते.
यावर मृणालने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रतिक्रिया देताना “तुम्हाला आम्ही फिट राहण्यासाठी किती मेहनत घेतो याची कल्पना आहे का? हा माझ्या शरीराचा भाग आहे आणि त्यात मी काही बदल करू शकत नाही”, असे म्हणत ट्रोल करणार्यांना उत्तर दिले आहे. याआधीही अनेक अभिनेत्रींना अशा प्रकारे असभ्य प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. मात्र मृणालने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.
हेही वाचा –