Wednesday, July 3, 2024

कुटुंबासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचली मृणाल ठाकूर, ‘फॅमिली स्टार’साठी घेतले आशीर्वाद

अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) अलीकडेच विजय देवरकोंडासोबत ‘फॅमिली स्टार’ चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट नुकताच ५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘फॅमिली स्टार’ या तिच्या नवीन चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने मृणाल अलीकडेच तिच्या कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली.

बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मृणाल ठाकूर तिच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचल्या. यावेळी अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी दिसत होती. आई-वडील आणि बहिणीसोबत ती सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यादरम्यान अभिनेत्रीने कुटुंबासोबत पापाराझींसमोर पोजही दिल्या.

यावेळी अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पांढऱ्या कुर्त्यासोबत ती ब्लू जीन्समध्ये दिसली. अभिनेत्रीचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. हातात घड्याळ आणि केस उघडे ठेवून तिने तिचा लूक पूर्ण केला. यावेळी मृणाल मेकअपशिवाय दिसली, चाहत्यांना तिचा साधा लुक आवडला.

‘फॅमिली स्टार’ बद्दल बोलायचे झाले तर दिग्दर्शक परशुराम पेटला यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 2018 च्या ब्लॉकबस्टर ‘गीता गोविंदम’ नंतर, विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक परशुराम पेटला यांनी ‘द फॅमिली स्टार’मध्ये दुसऱ्यांदा एकत्र काम केले आहे. विजय आणि मृणाल व्यतिरिक्त, चित्रपटात जगपती बाबू, अच्युथ कुमार, अभिनय, वासुकी, रोहिणी हट्टंगडी आणि रवी बाबू, दिव्यांश कौशिक, अजय घोष आणि इतर अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट दिल राजूने बनवला आहे. तर गोपी सुंदर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘द फॅमिली स्टार’ 5 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
HAAPY BIRTHDAY : सायकॉलॉजीची डिग्री घेतलेल्या रश्मिका मंदान्नाला गुगलने दिले ‘नॅशनल क्रश’चे स्थान, जाणून घ्या तिचा संपूर्ण प्रवास

हे देखील वाचा