देशातील नव्हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या मोठ्या सुनेला अर्थात श्लोका मेहताला १० डिसेंबरला मुलगा झाला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा विवाह मागच्या वर्षी श्लोका मेहता सोबत झाला होता.
रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला नुकतेच पुत्ररत्न झाले आहे. अंबानी कुटुंबाचे मुख्य प्रवक्ता यांनी ही माहिती देत सांगितले की, ” श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने अंबानी कुटुंबात नवीन पिढीचे आगमन झाले आहे. श्लोका मेहताने १० डिसेंबरला मुंबईत एका मुलाला जन्म दिला असून दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
नव्या बाळाच्या आगमनाने कोकिलाबेन अंबानी हे त्यांच्या पणतू तर मुकेश, नीता अंबानी हे आजी आजोबा या नात्याने अत्यंत आनंदी झाले आहेत. या बाळाच्या येण्याने अंबानी कुटुंबाच्या नवीन पिढीची सुरुवात झाली आहे.” दरम्यान मागच्या वर्षी मार्च २०१९ मध्ये आकाश आणि श्लोका यांचे ग्रँड वेडिंग जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न झाले होते. त्यांच्या लग्नाला अनेक देश-विदेशातील उद्योगपती, राजकारणी व कलाकार यांनी हजेरी लावली होती.
मुंबई पासून स्विझर्लंड पर्यंत या लग्नाचे कार्यक्रम झाले होते. श्लोका आणि आकाश हे लहानापासून एकमेकांचे मित्र होते. दोघांनीही धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. श्लोकाने लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड पॉलिटिकल साइंस या कॉलेजमधून लॉ मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. शिवाय श्लोकाने २०१५ मध्ये ‘कनेक्ट फॉर’ या नावाचा एक एनजीओ सुरु केला असून ह्या एनजीओ मार्फत गरजू लोकांना शिक्षण, घर आणि जेवण उपलब्ध करून दिले जाते.