Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन मुकेश खन्नाने एकता कपूरच्या टेलिव्हिजनवरील मालिकेवर साधला निशाना; म्हणाले, ‘सत्यानाश केला…’

मुकेश खन्नाने एकता कपूरच्या टेलिव्हिजनवरील मालिकेवर साधला निशाना; म्हणाले, ‘सत्यानाश केला…’

मुकेश खन्ना(Mukesh Khanna) यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अभिनेता पंकज बेरी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत म्हणाले, “मला पंकज बेरीची ही गोष्ट आवडली आहे की, आमची टेलिव्हिजन इंडस्ट्री सासू आणि सून यांच्यात कुठेतरी हरवली आहे.” ते पुढे म्हणाले, “मी 6 वर्षांपूर्वीच बोललाे होताे की, एकता कपूर तू सासू-सूनीवर मालिका बनवून टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा सत्यानाश केला आहे. हा व्हिडीओ 5 मिनिटे 14 सेकंदाचा असून त्यात त्यांनी इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

मुकेश खन्ना यांचा प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’वर बनवणार चित्रपट
मुकेश खन्ना यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘शक्तीमान’, ‘वारिश’, ‘विश्वामित्र’, ‘महायोधा’, ‘चंद्रकांता’ या सारख्या दमदार शोमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकेश खन्ना यांचा प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’वर चित्रपट बनवणार आहेत. त्यांच्या स्टारकास्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती समाेर आलेली नाही. हा शो पहिल्यांदा 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाला होता आणि 2005 पर्यंत चालला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रेयाकडे आहेत तब्बल ‘एवढ्या’ चपलांचे जोड; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘दुकानच टाकूया की मग’
आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला

हे देखील वाचा