Thursday, March 28, 2024

आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला

आपल्या फॅशन स्टेटमेंटने भल्या भल्या अभिनेत्रींना मागे सोडत उर्फी जावेद हिने आपला चाहतावर्ग निर्माण केलाय. जिथे बघावं, तिथं फक्त उर्फीचीच चर्चा रंगल्याचे दिसतंय. तिचे आगळ्या-वेगळ्या स्टाईलच्या ड्रेसमधले फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत. तिचे विमानतळावरचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. त्यामुळे चाहत्यांनाही प्रश्न पडतो की, ही विमानतळावर फक्त फोटोशूटसाठीच जाते की काय. अशात पुन्हा एकदा ती बोल्ड कपड्यांमध्ये विमानतळावर दिसली. उर्फीचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती जे काही बोलली त्याचीच चर्चा रंगलीये.

अनेक सेलिब्रिटी आणि लोक उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्याबद्दल बोलताना दिसतात की, ती फक्त कॅमेरा फुटेजसाठी विमानतळावर किंवा इतर ठिकाणी जाते. आता या नवीन व्हिडिओमध्ये उर्फी याचे उत्तर देताना दिसत आहे. उर्फी पॅपराजींना म्हणाली की, “आज तुम्ही लोकं विमानतळाच्या आत जाईपर्यंत माझा व्हिडिओ बनवा. त्यामुळे लोकांनाही कळेल की, मी विमानतळात घुसलीये.” यावेळी पॅपराजी तिला मिस करण्याबाबत बोलताच ती म्हणते की, “आता तिकीट दाखवू का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशाप्रकारे उर्फीने टीकाकारांना चांगलाच टोला लगावलाये. उर्फीने यावेळी आकाशी रंगाची ब्रालेट टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अबब! प्रदर्शित होण्याआधीच शाहरुखच्या चित्रपटाने केली बजेटपेक्षा जास्त कमाई
‘एकता कपूरच्या मालिकांनी टेलिव्हिजनची वाट लावली…’, दिग्गज अभिनेत्याची जोरदार टिका

हे देखील वाचा