आजकाल अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे आवडते कलाकार दररोज त्यांना भेटायला त्यांच्या घरी येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. अशातच सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे‘ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत दिसत आहेत. प्रेम करणारी दोन माणसे एकेमकांपासून दुरावून अनेक वर्षांनी एकत्र भेटतात. ही सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. उमेश आणि मुक्ता यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील तेवढी जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच उमेशने त्याचा आणि मुक्ताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उमेशने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि मुक्ताचा कार्पोरेट लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही खूप छान दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुक्ताने चॉकलेटी रंगाचे ब्लेझर आणि ट्राउजर घातले आहे. तसेच उमेशने निळ्या रंगाचे ब्लेझर आणि ट्राउजर घातले आहे. या फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री देखील खूप छान दिसत आहे. (Mukta barve and umesh kamat’s stunning photo viral on social media)
हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझा आधार” त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांच्या या फोटोवर उमेश कामतची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट हिने देखील हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच एका चाहत्याने “काय गोड जोडी आहे तुमची अशी कमेंट केली आहे.”
उमेश हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्याने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
तसेच मुक्ताने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘डबल सीट’, ‘हृद्यांतर’, ‘जोगवा’, ‘स्माईल प्लीज’, ‘रुद्रम’ या चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
प्रिया बापट अन् उमेश कामत यांच्या घरात त्यांच्या शिवाय आणखी कोण कोण राहतं? पाहा यादी
चाहत्याने कामाच्या केलेल्या कौतुकाबद्दल सांगताना, भावुक झाला अभिनेता भरत जाधव म्हणाला…