Thursday, April 18, 2024

चाहत्याने कामाच्या केलेल्या कौतुकाबद्दल सांगताना, भावुक झाला अभिनेता भरत जाधव म्हणाला…

आपल्या विनोदी स्वभावाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजेच भरत जाधव. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नाटकांमध्ये आणि विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या जरी तो जास्त चित्रपटात दिसत नसला तरी आजही त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर अमाप आहे. सोशल मीडियावर देखील तो अनेकवेळा पोस्ट शेअर करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट समोर आली आहे.

भरत जाधवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने एक भलीमोठी आणि भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, “मागच्या आठवड्यात काम करून रात्री घरी आलो, त्या दिवशी बराच उशीर झाला होता, भूकही लागली होती आणि फार दमलो होतो. आई आणि वडील बेडरूममध्ये झोपी गेले होते. फ्रेश झालो आमटी गरम केली, जेवण वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. मूड फ्रेश व्हावा म्हणून टीव्ही चालू केला 805 दाबलं हास्य जत्रा लागलं नव्हतं, म्हणून 804 वर गेलो ‘क्षणभर विश्रांती’ लागला होता. बरं वाटलं खरंच विश्रांती मिळाली आणि नेमका त्याचवेळी भरत जाधव त्या चौघांना बंगल्याबद्दल खरं सांगतो तो स्वतः सीन सुरू झाला होता.” (Marathi actor bharat jadhav share a emotional post on social media)

त्याने पुढे लिहिले की, “या आधी मी हा सीन खूप वेळा बघितला पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं, ते बघत असताना अंगावर काटे आले आणि भरत जाधवने त्याच्या तीन-चार मिनिटांच्या सीनने अक्षरशः रडवले. सीन संपला तेव्हा मी नि:शब्द झालो होतो. तेव्हा काय वाटलं होतं ते शब्दात तरी मला सांगता येणार नाही. पण बऱ्याच काळानंतर माझ्या तोंडी एक वाक्य आलं. च्यामायला भरत जाधवने रडवलं. आता दिवस होता परवाचा सेम रुटीन सर्व सेम. जेवण गरम केलं जेवायला बसलो. हास्य जत्रा लागलं नव्हतं म्हणून पुढे आलो आणि चित्रपट ‘शिक्षणाच्या आईचा घो’ लागला होता. श्रीला नुकतचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्यानंतर मी जे काही अनुभवलं ते खरं शब्दात सांगण्याच्या पलीकडचं होतं. आज पुन्हा एकदा भरत जाधवने मला रडवलं. ”

पुढे भरतने लिहिले की, “आजपर्यंत अनेक मराठी हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांचे चित्रपट आठवायचा प्रयत्न केले की, कोणती अभिनेत्याचा अभिनय बघून मला असा वेगळाच अनुभव आला आणि रडायला आलं. उत्तर मिळाले एकही नाही! त्या क्षणी बाकी जगाचं माहीत नाही पण माझ्यासाठी भरत जाधव हा जगातील सर्वात उत्कृष्ट अभिनेता होता. आता जोपर्यंत एखादा अभिनेता असं काही किंवा यापेक्षा धमाल अनुभव देत नाही तोपर्यंत माझ्यासाठी भरत जाधवचं सर्वोत्कृष्ट अभिनेता असेल. (प्रशांत बर्गे)
‌‌
शेवटी त्याने लिहिले की, “काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने हा मेसेज केला होता. खरंतर कलाकाराने स्वतःचे कौतुक करायचं नसतं. पण एका रसिकाने मनापासून दिलेली सुखद दाद तुम्हा सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली.”

त्याने त्याच्या चाहत्यांचा शेअर केलेला हा अनुभव अनेक कलाकारांना खूप आवडला आहे. तसेच या पोस्टवर अनेक कलाकार सातत्याने कमेंट करत आहेत. तसेच त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत.

भरत जाधवने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भुताचा हनिमून’, ‘नाना मामा’, ‘होऊन जाऊ दे’, ‘अगंबाई अरेच्चा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणदीप रायसोबतच्या नात्यावर शिवांगी जोशीने तोडले मौन; म्हणाली, ‘अशा बातम्या …’
सुशांतच्या मुंबईतील घराला अद्याप मिळाले नाही भाडेकरी; घरमालक म्हणाला, ‘लाेक घाबरतात…’

हे देखील वाचा