Monday, July 8, 2024

हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल

मागील अनेक दिवसांपासून देशात आर्यन खान अं’मली पदार्थ केस तुफान गाजत आहे. ज्या दिवशी आर्यनला या आरोपांमध्ये ताब्यात घेण्यात आले त्यादिवसापासून सतत ही बातमी आपल्याला प्रसार माध्यमांमधून पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत होत्या. अखेर २८ ऑक्टोबर रोजी आर्यनला कोर्टाने जामीन मंजूर केला आणि आर्यनच्या चाहत्यांमध्ये, कुटुंबामध्ये एकच जल्लोष झाला. आर्यनला जामीन मिळवून देण्यामध्ये तीन वकिलांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि त्याला बाहेर काढले. सतीश मानशिंदे, अमित देसाई आणि मुकुल रोहितगी या तीन वकिलांनी मोठी भूमिका बजावली.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तो त्याच्या वकिलांच्या टीमसोबत दिसत आहे. बार अँड बेंचने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, शाहरुख खान ज्येष्ठ वकील अमित देसाई, वकील सतीश मानशिंदे दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहिले तर शाहरुख खानच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. मात्र ज्यांनी आर्यनची बाजू कोर्टात मांडली ते जेष्ठ वकील आणि माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी फोटोमध्ये दिसत नाहीये.

Photo Courtesy: Instagram/___aryan___

एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर त्याचे वकील म्हणून सतीश मानशिंदे केस लढत होते. सतीश मानशिंदे यांनीच रिया चक्रवर्तीची अं’मली पदार्थांची केस लढवली होती त्यानंतर या केसमध्ये एन्ट्री झाली ती अमित देसाई या वकिलांची यांनी सलमान खानची हिट अँड रनची केस लढत त्याची निर्दोष मुक्तता केली होती. या दोन्ही वकिलांनी मिळून कोर्टात आर्यनची बाजू मांडली. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर जेष्ठ वकील मुकुल रोहितगी यांनी आर्यनची केस लढवली.

आर्यन खानच्या बचावासाठी आलेल्या या सर्व वकिलांची माहिती जाणून घेऊया.

मुकुल रोहतगी, भारताचे माजी अॅटर्नी जनरल :

मुकुल रोहतगी यांनी २०१४ ते २०१७ पर्यंत तीन वर्षे भारताचे १४ वे महाधिवक्ता म्हणून काम केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अवध बिहारी रोहतगी यांचे ते पुत्र असून, मुकुल हे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत. मुकुल रोहतगी यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी पूर्ण केली आणि कायद्याचा सराव सुरू केला. त्यांना १९९३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

रोहतगी यांच्याकडे अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठ्या चर्चेत असणाऱ्या केसेस आल्या आहेत. त्यात २००२ च्या गुजरात दंगलीचा खटला आहे. यात ते गुजरात सरकारच्या बाजूने न्यायालयात पक्ष मांडत होते.

आर्यन खानच्या जामीनानंतर रोहतगी म्हणाले की अंमली पदार्थांची प्रकरणे ही नेहमीची बाब आहे. “आर्यन आणि या खटल्यातील त्याचे सह-आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा न्यायालयाचा आदेश आल्यानंतर तुरुंगातून बाहेर येतील. माझ्यासाठी, हे नेहमीचेच प्रकरणं आहेत. त्यांना जामीन मिळाल्याचा मला आनंद आहे,”

सतीश मानेशिंदे, फौजदारी वकील

सतीश मानेशिंदे, ज्यांच्या क्लायंटमध्ये सलमान खान, संजय दत्त, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि आता आर्यन खान यांसारखे सेलिब्रिटी आहेत. ते बॉलिवूडचे आवडते वकील आहेत. २००२ मध्ये अभिनेता सलमान खानची हिट अँड रन केस त्यांच्याकडे गेल्यानंतर ५६ वर्षीय सतीश मानेशिंदे चर्चेत आले होते. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणातही मानेशिंदे यांनी सलमान खानचा बचाव केला.

Photo Courtesy: Instagram/___aryan___ & keshri_abhi

१९९३ मध्ये, मानेशिंदे यांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचे प्रतिनिधित्व केले आणि त्याला जामीन मिळवून दिला. दया नायकचे मालमत्ता प्रकरण, शोभन मेहता मॅच-फिक्सिंग प्रकरण आणि छोटा राजनची पत्नी सुजाताच्या संघटित गुन्हेगारीचे प्रकरणही त्यांनी हाताळले असल्याचे सांगितले जात आहेत.

सतीश मानशिंदे १९८३ मध्ये मुंबईत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असताना, मानेशिंदे यांनी प्रसिद्ध फौजदारी वकील दिवंगत राम जेठमलानी यांच्या हाताखाली कनिष्ठ वकील म्हणून काम केले आहे.

अमित देसाई, फौजदारी वकील

अमित देसाई हे ज्येष्ठ वकील आणि मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत. २००२ च्या ‘हिट अँड रन केस’मध्ये सलमान खानला जामीन मिळवून देण्यात माणशींदेंसह देसाई यांचा मोलाचा वाटा होता. डिसेंबर २०१५ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने २००२ च्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

या तीन मोठ्या वकिलांसोबतच रुबी सिंग आहुजा, संदीप कपूर, आनंदिनी फर्नांडिस आणि मुल्ला लॉ फर्मचे भागीदार रुस्तम मुल्ला आदी मोठी नावे होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन; क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली माहिती

-चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या पुनीतने बालपणीही गाजवलीय सिनेसृष्टी; दोन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ केले होते नावावर

-मोठी बातमी! सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनामुळे कर्नाटकात दु:खी चाहते उतरले रस्त्यावर, कलम १४४ लागू

-‘पावरस्टार’ पुनीतच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी; चिरंजीवी ते नागार्जुन, ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दु:ख

हे देखील वाचा