प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांच्या मुलाला अटक; कपिल शर्माला लावला होता कोटी रुपयांचा चुना


आपल्या शानदार विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा कॉमेडियन म्हणजे कपिल शर्मा होय. कपिल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतेच तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच केलेल्या तक्रारीच्या आधारावर दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनिटो छाब्रियाला अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, बोनिटोला न्यायालयात दाखल करून न्यायालयीन कोठडीसाठी पाठवले आहे. महत्त्वाचं म्हणजे, बोनिटोने कपिलची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.

काय आहे हे प्रकरण?
पोलिसांनी सांगितले की, कपिल शर्माने मागील वर्षी मुंबईत फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्याने कार डिझायनर दिलीप छाब्रियांच्या मुलावर त्याच्याकडून ५.३ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप लावला होता. कपिलने पोलिसांना सांगितले होते की, त्याने आपल्यासाठी एक व्हॅनिटी बस डिझाइन करण्यासाठी मार्च आणि मे २०१७ दरम्यान छाब्रियाला ५ कोटी रुपये दिले होते. मात्र, २०१९ पर्यंत कोणतेच काम करण्यात आले नाही. यानंतर त्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क केला होता. (Mumbai Police Arrested Dilip Chhabria Son In A Cheating Case Registered On The Complaint of Comedian Kapil Sharma)

दुसरीकडे छाब्रियाने व्हॅनिटी बसच्या पार्किंगचे शुल्क म्हणून कॉमेडियनला १.२० कोटी रुपयांचे बिल पाठवले होते. यानंतर कपिलने पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यानंतर बोनिटोला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

कपिलबाबत बोलायचं झालं, तर तो आपल्या ‘द कपिल शर्मा शो’सह परतला आहे. तसेच पुन्हा एकदा जोमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच कपिलने शोचे सूत्रसंचालन करण्याव्यतिरिक्त चित्रपटातही काम केले आहे. त्याने आतापर्यंत ‘किस किसको प्यार करू’, ‘फिरंगी’, ‘शेरखान’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याव्यतिरिक्त कपिल सोशल मीडियावरही कमालीचा सक्रिय असतो. त्याचा सोशल मीडियावर जबरदस्त चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ३४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भूमिकेसाठी आपण जे करतो तेच भूमिका आपल्यासाठी करते’, म्हणणाऱ्या मोहित रैनाने सिनेमासाठी शिकली परदेशी भाषा

-आता आख्खं जग फिरूनच घरी येणार! अजित कुमार यांनी सुरू केली जगभ्रमंती

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान


Leave A Reply

Your email address will not be published.