Monday, August 4, 2025
Home कॅलेंडर मुंबईकर चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच, करण जोहरच्या हस्ते झाले लॉंच

मुंबईकर चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच, करण जोहरच्या हस्ते झाले लॉंच

कोरोनामुळे आणि इतर वाईट घटनांमुळे २०२० हे वर्ष सर्वांसाठी आणि बॉलिवूडसाठी अतिशय त्रासदायक होते. परंतु मागील वर्षाच्या कटू आठवणींना मागे सारत सर्वांनी २०२१ चे जोरदार स्वागत केले. बॉलिवूडने देखील नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करताना नवीन चित्रपटाच्या घोषणा केल्या आहे. २०२० मध्ये अनेक चित्रपट अडकले होते मात्र आता २०२१ मध्ये सर्वांनी पुन्हा जोमाने कमल लागत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

२०२१च्या वर्षाची सुरुवात अधिक चांगली करण्यासाठी करण जोहरने नुकतीच एका चित्रपटाची घोषणा केली आहे. करण जोहरने ‘मुंबईकर’ नावाच्या चित्रपटाची घोषणा करत सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल ट्विटरवर शेयर केले आहे.

 

हा सिनेमा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून यातून मुंबईच्या अनेक माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आह. स्लमडॉग मिलिनियर, आणि गल्ली बॉय या चित्रपटांनंतर ‘मुंबईकर’ सिनेमातून मुंबईचे अजून विविध पैलू मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत. करणने जोहरने पोस्टर ट्विट करताना लिहले की, “या सिनेमातून तुम्हाला सिनेमॅटिकचा जबरदस्त अनुभव मिळणार आहे. मी दिग्दर्शक संतोष सिवान, विजय सेथूपति, विक्रांत मेस्सी, संजय मिश्रा, रणवीर शोरी, सचिन खेड़ेकर यासर्वांना चित्रपटासाठी शुभेच्छा देतो.”

या सोबतच करणने त्याचा एक व्हीडिओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडिओत त्याने म्हणले की, “या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करताना मला खूप अभिमान वाटत आहे. चित्रपट सृष्टीतील संतोष सिवान आणि विजय सेथूपति यांसारख्या दोन दिग्गज कलाकारांना मी खूप फॉलो करतो. या दोन महान लोकांनी मला या सिनेमाचा पहिला लुक प्रदर्शित करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. ”

तर संतोष सिवान यांनी त्याच्या व्हिडिओत सांगितले की, “प्रत्येक शहराला त्याचे स्वतःचे सौंदर्य असते. यात मुंबई काही अपवाद नाही. मुंबई इतकी सुंदर आहे म्हणूनच भारतातील अनेक लोक या शहराकडे आकर्षित होतात. या शहरात अनेक जाती, धर्मांचे लोक राहतात. या शहराला स्वप्ननगरी म्हणतात. मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलातही अनेकांचे ह्रदय धडधडते. मुंबई जरी मेट्रो शहर असले, तरी ‘मुंबईकर’ ही भावना आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिवान करत असून, निर्माता करण जोहर आहे.

हे देखील वाचा