Tuesday, March 5, 2024

आएशा खानच्या एविक्शनपुर्वी मुनावरने मागीतली माफी,घराबाहेर पडताच मन्नाराने घेतली गळाभेट

सलमान खानचा(salman khan) रिऍलिटी शो ‘बिगबाॅस 17’मध्ये प्रचंड कोलाहल माजला आहे. शो जसजसा फिनालेकडे जात आहे तसतसं त्यातील भांडणं वाढतंच आहेत.बिगबाॅसचा हा सिझन 28 जानेवारीला संपणार आहे. शोमधले स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आतोनात प्रयत्न करताना दिसत आहेत. या शोच्या आत्ताच झालेल्या एपिसोडमध्ये आयशा खान, मुनावर फारुकी, अंकीता लोखंडे, आणि अभिषेक कुमार लाइव प्रेक्षकांसमोर त्यांच्या स्पर्धकांना रोस्ट करताना दिसले. लाइव ऑडियन्सच्या वोटच्या आधारावर आएशा खानला फिनालेच्या फक्त एक आठवडा आधी रविवारी शोमधून इलिमिनेट करण्यात आलं.

मन्नाराने घेतली आएशाची गळाभेट
‘बिगबाॅस 17’च्या या आठवड्यात आयशा खान, मुनावर फारुकी, अंकीता लोखंडे, आणि अभिषेक कुमार हे नाॅमिनेटेड कंटेस्टंट होते. यांच्यातुन आएशा खानला शोमधून बाहेर काढण्यात आलं. ज्याला ती टु टायमिंग असं म्हणली होती,त्याप्रकरणी आएशाच्या इलिमिनेशन आधी मुनावरने तिची माफी मागितली. एविक्शनच्या घोषणेनंतर मन्नारा चोप्राने(mannara chopra) आएशाची गळाभेट घेतली आणि तिला हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या तिच्या चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये सहभागी व्हायलाही सांगितले. शोमध्ये एंट्रीच्या वेळी आएशाने मुनावरवर काही गंभीर आरोप लावले होते. दावा केला होता की, तो तिच्यासोबत डबल डेटिंग करत आहे.

आएशाने मुनावरवर केले होते हे आरोप
आएशा खान ने दावा केला होता की बिगबाॅस 17मध्ये(bigboss 17) येण्याआधी, मुनावर(munawar faruqui) तिला एका म्यूझिक विडीयोमध्ये कास्ट करणार होता. त्यासाठी त्याने सोशल मिडियावरुन तिच्याशी संपर्कही साधला होता. तिनं सांगितलं होतं की,’तो विडीयो प्रत्यक्षात कधी बनलाच नाही. परंतू जेव्हा मी दुसऱ्यांदा भेटले तेव्हा तो महणाला की, तो माझ्यावर प्रेम करतो.’

आएशाने एका एपिसोडमध्ये केला होता असाही खुलासा
एका एपिसोडमध्ये आएशा(ayesha khan) म्हणाली होती की,” जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्याच्या घरी भेटलो होतो. तेव्हा आम्ही कविता आणि आमच्या संपुर्ण संभाषणा दरम्यान आम्ही कनेक्टेड राहिलो. त्याने त्याच्या कौटुंबिक गोष्टीही माझ्याशी शेअर केल्या.” तिने पुढे सांगितले की, ” ती आमची पहिली भेट होती. ज्यात त्याने त्याच्या आई-वडिलांशी संबंधित सगळ्या गोष्टी, त्याचसोबत त्याच्या आधीच्या पत्नीसोबतच्या नात्याविषयी आणि पुर्व प्रेयसी नाजिलाची कहानीही त्याने सांगितली होती. “

हे देखील वाचा