काही दिवसांपूर्वी सुरु झालेला कंगना रणौतचा ‘लॉकअप’ हा शो अतिशय लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये नेहमीच स्पर्धकांकडून वेगवेगळे धक्कादायक खुलासे केले जातात. शोचा स्पर्धक असणारा मुनव्वर फारूकीने नुकताच एक अतिशय भावनिक आणि मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून कंगनाला देखील भरून आले होते. कंगनाने मुनव्वरला त्याचे एक गुपित सांगण्यास सांगितले. त्यावर त्याने त्याच्या ऐशी संबंधित एक गुपित सर्वांसमोर मांडले. तो म्हणाला भलेही हे गुपित त्याला शोमधून बाहेर होण्यापासून वाचवू शकेल की नाही माहित नाही तरीही तो हे गुपित सांगणार आहे.
तो म्हणाला की, “ही गोष्ट आहे जानेवारी २००७ ची. जेव्हा माझ्या आजीने मला सकाळी सात वाजता उठवले आणि सांगितले की, तुझ्या आईला काहीतरी झाले आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे. जेव्हा माझ्या आईला इमर्जन्सी विभागातून बाहेर आणले गेले तेव्हा ती जोरजोरात ओरडत होती. तिचा हात पोटावर होता आणि एक हात मी पकडला होता.”
पुढे तो म्हणाला, “माझे संपूर्ण कुटुंब तिथे होते पण मला कोणीच काही सांगितले नाही. त्यानंतर आईला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मग माझी आजी मला म्हणाली की आईने ऍसिड प्यायले आहे. मी तिला विचारले की आपण हे डॉक्टरांना का नाही सांगत तर ती म्हणाली की आपणच प्रोब्लेममध्ये येऊ. माझी एक बहीण तिथे नर्स होती जेव्हा मी तिला हे सांगितले तेव्हा तिला धक्काच बसला. त्यानंतर आईवर उपचार चालू झाले. मला अजून आठवते शुक्रवारची दुपार होती डॉक्टरांनी मला आईचा हात सोडण्यास सांगितले. मी सोडला नाही म्हणून त्यांनी जबरदस्तीने हात सोडवला तेव्हा मला जाणवले की आईचे निधन झाले आहे. तरीही मला तिला दूर जाऊ दयायचे नव्हते. डॉक्टरनी आम्हाला हे देखील सांगितले की, आईने ८ दिवसांपासून काहीच खाल्ले नव्हते.”
मुनव्वर पुढे म्हणाला की, “माझी आई तिच्या २२ वर्षाच्या वैवाहिक जीवनात कधीच सुखी नव्हती. मी नेहमीच तिला मार खाताना पाहिले. सतत माझी आईवडील भांडण करायचे.” त्याचा हा खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पूनम पांडे आणि करणवीर बोहरा यांनी त्याला शांत केले. या आठवड्यात मंदाना करीमी या शोमधून बाहेर पडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-