Wednesday, January 14, 2026
Home अन्य केकेनंतर आणखी एका गायकाचे निधन; दुर्गापूजादरम्यान स्टेजवर गाणी गाताना कोसळले

केकेनंतर आणखी एका गायकाचे निधन; दुर्गापूजादरम्यान स्टेजवर गाणी गाताना कोसळले

ओडिशाचे लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणे गात असताना कोसळले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी गायकाला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

ओडिशात एका दुर्गापूजेदरम्यान गाणेचं लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुरली प्रसाद महापात्रा हे ओडिशातील जयपूर शहरातील कोरापूट या ठिकाणी दुर्गापूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी चार गाणी गायली. यानंतर पाचवे गाणे सुरु होण्यापूर्वी ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी स्टेजवर एका खुर्चीवर बसले. त्यानंतर ते गाण्यासाठी उभे राहिले असता ते अचानक स्टेजवर कोसळले. महापात्रा यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मुरली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. गायक मुरली महापात्रा यांचे बंधू बिभूती प्रसाद महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती. मुरली 59 वर्षांचे होते.

मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
मुरली प्रसाद महापात्रा यांच्या निधनानंतर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे,”प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाने मी खूप दु:खी आहे. त्यांचा सूर या आसमंतात सतत निनादत राहो, हीच या पृथ्वीवरच्या सर्व देवी-देवतांना प्रार्थना. त्यांचा मधुर आवाज श्रोत्यांच्या हृदयात नेहमीच आनंदाची भावना निर्माण करेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

माता दुर्गाच्या पुजेला बॉलिवूड कलारांची गर्दी, देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचले ‘हे’ दिग्गज कलाकार

यावरुन चाहते केकेच्या आठवणीत
गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकातातील स्टेजवर लाईव्ह परफार्म करताना गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटकण्याने निधन झाले आहे. केके यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच पुन्हा एकदा लाईव्ह परफार्म दरम्यान मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे चाहत्यांना केकेची आठवण आली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…
बापरे..! टायगर श्रॉफला नक्की झालंय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड काळजीत, कारणही आलंय समोर

हे देखील वाचा