Saturday, July 27, 2024

Pankaj Udhas passes away: प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गझल गायक पंकज उधास (Music legend Pankaj Udhas passes away)यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. 

पंकज यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककाळा पसरली आहे. गेले कित्येक दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं रुग्णालयातच निधन झालं.

पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे बाळकडु मिळाले होते.

चिट्ठी आई है आई है…, ना कजरे की धार ना मोतियों के हार…, आज फिर तुम पे प्यार आया है…, चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल… आदी लोकप्रिय गाण्यांनी पंकज उधास यांनी रसिकांचे मनं जिंकले होते.

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले.  केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पंकज उधास यांचे चाहते होते. त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

हे देखील वाचा