झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१ शनिवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी ७ वाजता टेलिकास्ट होणार आहे. शो सुरू होण्यास अगदी काही तास उरले आहेत. मागील अनेक दिवसापासून या शोमधील काही बीटीएस व्हिडिओ समोर येत आहेत. कलाकारांचा रेड कार्पेटवरील लूक देखील समोर आला आहे. अशातच या शोमधील सगळ्यात गोड आणि क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. क्यूट हा शब्दप्रयोग करताच तुमच्या मनात सगळ्यात आधी परीच आली ना? अगदी बरोबर, या पुरस्कार सोहळ्यातील ‘माझी तुझी रेशीमगाठ’, मधील परी आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील मोहितचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
इंस्टाग्रामवर टीआरपी मराठीच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मोहित आणि परी ‘माझी बाय गो’, या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहेत. त्यांचा हा लूक झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवरील आहे. यावेळी मायराने म्हणजेच आपल्या परीने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातलेला आहे आणि निखिल राऊतने देखील पिवळ्या रंगाचा शर्ट आणि पँट परिधान केली आहे. (Myra vaikul and Nikhil raut’s video viral on social media)
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, निखिल अगदी आनंदात येऊन ‘सांग लगीन तू करशील का?’ म्हणत असतो. यावर मायरा काहीही न बोलता रागात ओढणी बांधते तोपर्यंत निखिल तेथून गेलेला असतो. यात मायराचे शेवटचे हावभाव बघण्यासारखे आहेत. त्यांचा हा गोड व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.
मायरा सध्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बालकलाकार झाली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील तिचा अभिनय सगळ्यांनाच खुप आवडला आहे. तसेच निखिल ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या पात्राला देखील चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे
-साप्ताहिक कार्यात मीराने मीनलला दिले ‘हे’ मोठे आव्हान, ऐकून सर्वच झाले स्तब्ध
-बिग बॉस मराठी: ‘जय वीरू’ची जोडी तुटणार? विशालने केले ‘असे’ कृत्य की, विकासला अनावर झाले अश्रू