Wednesday, July 3, 2024

निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?

येत्या शनिवारी (३० ऑक्टोबर) झी मराठी सोहळ्याचे टेलिकास्ट केले जाणार आहे. या वर्षी हा भव्य सोहळा बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. कारण यावर्षी झी मराठीवर तब्बल पाच नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या मालिकांनी अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे कोणत्या कलाकाराला कोणते पुरस्कार मिळणार आहेत. हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

अशातच या पुरस्कारसाठी नॉमिनेट झालेले काही कलाकार ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आले आहेत. नुकतेच हा भाग टेलिकास्ट झाला आहे. यातील एक खास गोष्ट म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार यासाठी नॉमिनेशन मिळाले आहे. त्यामुळे मायरा देखील या शोमध्ये आली होती. यावेळी मायरा निलेश साबळेचा अभिनय करत ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसली. तसेच ती निलेश साबळेच्या खुर्चीवर बसून सगळे डायलॉग म्हणतात दिसते. ती हे देखील सांगते की, तो झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील सूत्रसंचालन करणार आहे. (Myra vaikul’s anchoring on chala hava yeu dya program)

यात ती म्हणते की, “नमस्कार मी परी, तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे, तुमच्या आवडत्या प्रोग्राममध्ये ज्याचे नाव आहे चला हवा येऊ द्या.” तिच्या या वाक्यानंतर सगळेच टाळ्या वाजवत तिचे कौतुक करतात. यानंतर निलेश साबळे तिला विचारतो की, “झी मराठी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन तू करणार आहे का?” यावर परी “हो” असे उत्तर देते. यावर निलेश म्हणतो की, “मी करणार आहे, मला चॅनलचा फोन आला होता, ते मला पैसे देणार आहेत.” यावर परी म्हणते की, “मला फोन आला होता मला देणार आहेत.” यावर निलेश म्हणतो की, तुला काय देणार आहे.? परी म्हणते की, “बिस्कीट पुडा.”

यावर तिला सगळेच हसतात. नंतर निलेश साबळे तिला विचारतो की, “तू कोणाला पुरस्कार देणार मग?” मग परी विचार करून स्वीटू दीदीला देणार म्हणते कारण तिचा सेट आमच्या शेजारीच आहे. तसेच ती सांगते की, ती मला खूप चॉकलेट देते. यावर सगळेच हसतात आणि परीच्या अभिनयाचे आणि चातुर्यबुद्धीचे कौतुक देखील करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा