मंजिरी फडणीस या मराठी अभिनेत्रीने आजवर मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवलेला आहे. नुकत्याच आलेल्या अदृश्य या रहस्यपटातल्या मंजिरीच्या भूमिकेचे बरेच कौतुक होते आहे. प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असलेल्या नायिकेची भूमिका यात मंजिरीने ताकदीने निभावली होती.
सध्या मंजिरी फडणीस (Manjari Fadnis) चर्चेत आहे ते तिच्या एका खास वेब सिरीजमुळे. ही सिरीज एमएक्स प्लेअरवर एक्सक्लुजिव रूपात पाहता येणार आहे. ‘मिया बिवी और मर्डर’ (Miya Biwi aur Murder) ही ती सिरीज असून यात रहस्य, रोमांच असा मसाला पुरेपूर भरलेला आहे. 1 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या तिच्या या सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.
यात मंजिरी फडणीससह राजीव खंडेलवाल हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. राजीव यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मंजिरी पत्नीची भूमिका निभावत असून तिच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे प्रिया. मंजिरीने याविषयी नुकतीच स्वदेशी सोशल मीडिया मंच कू वर खास पोस्ट केली आहे.
नुकतेच आले आहे ट्रेलर
‘मिया बीवी और मर्डर’चे ट्रेलर नुकतेच आले असून यात अत्यंत उत्कंठावर्धक पट उलगडताना दिसतो. पोलिस अधिकारी असलेल्या पतीचे अफेअर घरातल्या कामवाल्या बाईसोबत सुरू असते. तिकडे प्रिया अर्थात मंजिरीचेही अफेअर कुणासोबत तरी चालू असते. यातच कामवालीचा सांगते की, ती आई बनणार आहे. अचानकच तिचा खून होतो. दुसरीकडे प्रियाच्या बॉयफ्रेंडचीही एकाएकी हत्या होते. या दोन्ही हत्या झाकण्यास अजून काही हत्या होतात. आता हे बघणे रंजक असते, की दोघे पती-पत्नी या संकटांचा सामना करत सहीसलामत बाहेर पडू शकतात का? हे पाहणे रंजक असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-