Tuesday, April 16, 2024

‘हिंदूंनो जागे व्हा…’, मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

शरद पोक्षें (Sharad Ponkshe) हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या कसदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे अभिनेते शरद पोक्षें आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत येत असतात. सोशल मीडियावरुन ते अनेक विषयांवर आपले स्पष्ट मत व्यक्त करत असतात. सध्या देशात चर्चा होत असलेल्या राजस्थानमधील हत्येनंतर अभिनेते शरद पोक्षें यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

राजस्थामध्ये झालेल्या हत्येमुळे देशभरात खळबळ माजली आहे. राजस्थानमधील उदयपुर शहरात दोन युवकांनी भरदिवसा कन्हैय्यालाल या युवकाची निर्घुण हत्या केली होती. मंगळवार २८ जून रोजी ही धक्कादायक घटना समोर आली होेती. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक कलाकारांनी या घटनेचा सोशल मीडियावरुन निषेध केला आहे याच संदर्भातील अभिनेते शरद पोक्षें यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शरद पोक्षें यांनी ही पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांनी दिलेल्या एका संदेशाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरू लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल’ असा संदेश लिहलेला दिसत आहे. यासोबतच शरद पोक्षें यांनी “जे उदयपुरमध्ये घडले ते पाहिल्यावर स्वा. सावकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार विचार आठवतात, हिंदुंनो जागे व्हा” असा कॅप्शन दिला आहे. सध्या शरद पोक्षें यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

दरम्यान अभिनेते शरद पोक्षें सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’ ही मालिकाही चांगलीच गाजली होती. परंतु शरद पोंक्षे सर्वात जास्त ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे चर्चेत आले होते.

हे देखील वाचा