Monday, July 1, 2024

‘नागीण ५’ फेम अभिनेत्री मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; तिच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय राडा

कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसे पर्यटन सुरु झाले आणि अनेक महिने घरात कैद झालेले लोकं आणि कलाकार देखील आता हळू हळू बाहेर पडत. कोरोनामुळे कंटाळलेले, वैतागलेले कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचा आळस झटकत आहे. टीव्ही, चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये काम करणारे कलाकार विविध ठिकाणी जाऊन त्यांची या कोरोना काळातील निराशा झटकत आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदना देखील सुट्यांचा आनंद घेत आहे. ती सध्या मालदीवमध्ये असून तिथले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. या फोटोंमध्ये तिने तिचे काही बिकिनी फोटो देखील पोस्ट केले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच लाइमलाईट्मधे आले असून, तुफान व्हायरल होत आहे. (naagin 5 fame surbhi chandna enjoying maldives vacation)

सुरभीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अवतार दिसत आहे. तिने पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ती पूलमध्ये बसून ब्रेकफास्टचा आनंद घेत आहे.

सुरभीने तिचे मालदीव हॉलिडेचे फोटो पोस्ट करताना लिहिले, “आज सकाळी चेक आऊट करण्याआधी मी समुद्रात डुबकी मारण्याचे ठरवले. हा एक सरप्राइज प्लॅनचा भाग होता. #floatingbreakfast, #swipeleft असे काही हॅशटॅग देखील वापरले आहेत. तिच्या या फोटोना आतापर्यंत ८० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज आले असून, भरपूर कमेंट्स देखील आल्या आहेत.

सुरभी एक अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल देखील आहे. तिला इंस्टाग्रामवर ४.४ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. सुरभीने तिच्या अभिनयाची सुरुवात अनेक लहान लहान भूमिका साकारत केली. आतापर्यंत तिने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’, ‘इश्कबाज’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘संजीवनी’, ‘नागिन ५’, आदी मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच सुरभीचे ‘बेपनाह प्यार’ हे गाणे देखील प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा