Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड “वैयक्तिक मतांना मान्यता…”, लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

“वैयक्तिक मतांना मान्यता…”, लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला व्हलगर तसंच प्राेपगंडा म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक कलाकार भाष्य करत आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर नदाव झाले नाराज
IFFI 2022 च्या समारोप समारंभाला संबोधित करताना, नदाव लॅपिड म्हणाले की, “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर खुलेपणाने मांडू शकतो. ही चर्चा या मंचावर होणं गरजेचं आहे.” केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत नदाव यांनी हे वक्तव्य केले.

नदाव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या वक्तव्यानंतर IFFI मधील इतर ज्युरींनी त्यांचं मत स्पष्टच मांडलं आहे. त्यांनी चित्रपटाबाबत लॅपिड याचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितले. तसेच काेणीही राजकीय टीका केली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाते सर्वत्र झाले काैतुक
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जाताे. या चित्रपटाचे सर्वत्र काैतुक करण्यात आले.  चित्रपटाची कथा 90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन आणि दहशतवादाच्या शिखरावर आधारित आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट 11 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा IFFI च्या ‘इंडियन पॅनोरमा सेक्शन’चा भाग होता आणि 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (nadav lapid the kashmir files remark iffi jury board separate self to his comment)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणारे नदाव लॅपिड आहे तरी काेण? जाणून घ्या

‘मी लोकांच्या प्रेमाचा गुलाम आहे’, राजकारणासाठी चिरंजीवी कधीही सोडणार नाही चित्रपट

हे देखील वाचा