Wednesday, July 2, 2025
Home साऊथ सिनेमा नागा चैतन्य -सामंथा वेगळे हाेण्यामागचं खरं कारण समाेर !

नागा चैतन्य -सामंथा वेगळे हाेण्यामागचं खरं कारण समाेर !

नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)यांचा चार वर्षांनी घटस्फाेट झाला हाेता. आता इतक्या वर्षांनी त्यांच्या वेगळं हाेण्यामागचं खरं कारण समाेर आलयं.

साउथ अभिनेता नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभु यांना एकमेकांपासून वेगळं हाेऊन 4 वर्ष झाली आहेत. त्यांच्या घटस्फाेटामागचं कारण 200 काेटी रुपयांचा माेठा एलिमनी असल्याचं सांगितलं जात हाेतं. पण आता त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं हे सगळं अफवा असल्याचं सांगितलं आहे. सामंथाला कुठलाही 200 काेटींचा गुजारा भत्ता मिळालेला नाही, ही गाेष्ट खाेटी आहे.

स्वतः नाग चैतन्यने 200 काेटींच्या एलिमनीबाबतच्या अफवा खाेट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. अलीकडेच एका पाॅडकास्टमध्ये ताे म्हणाला, “आम्ही दाेघांनी वेगळं हाेण्याचा निर्णय आमच्या स्वतःच्या कारणांसाठी घेतला. आम्ही दाेघंही एकमेकांचा सन्मान करताे आणि आता आपआपल्या आयुष्यात पुढे जात आहेत”.

‘काॅफी विथ करण’ मध्ये सामंथानं एखदा या अफवांवर थेट बाेलताना म्हटलं हाेतं, “लाेक म्हणतात मी 200 काेटींचा एलिमनी घेतलाय. मी तर राेज सकाळी वाट बघत बसले हाेते की आयकर विभागाचे लाेक येतील आणि बघतील की माझ्याकडे काहीच नाही ! आधी लाेकांनी एलिमनीबाबत अफवा पसरवली, नंतर त्यांना वाटलं की, ही प्री-नप्ट झालयं म्हणून मी पैसे मागू शकत नाही. पण खरं सांगायचं तर मी काेणाकडूनही एक रुपयाही घेतलेला नाही”.

नाग चैतन्य आणि सामंथाचा एक जवळचा मित्र, जाे दाेघांनाही चांगला ओळखताे, त्यानं त्यांच्या घटस्फाेटाबद्दल बाेलताना म्हटलं, “जेव्हा दाेन लाेक समजुतीन आणि सन्मान ठेवत वेगळं हाेण्याचा निर्णय घेतात, तेव्हा एलिमनीसारख्या गाेष्टींचा काही संबंध राहत नाही. हा निर्णय पैशांसाठी नव्हता, तर शांतपणे आणि चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्यासाठी हाेता”.

नागा चैतन्य आणि सामंथाचं लग्न 2017 मध्ये झालं हाेतं आणि त्यांनी 2021 मध्ये वेगळं हाेण्याचा निर्णय घेतला. सामंथापासून वेगळं झाल्यावर नागा चैतन्यनं 2024 मध्ये शाेभिता धुलीपालाशी दुसरं लग्न केलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

धनुष आणि नागार्जुन यांचा कुबेर लवकरच येणार ओटीटीवर; या तारखेपासून बघता येणार सिनेमा…

हे देखील वाचा