Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नागराज मंजुळे यांच्या नवीन सिनेमाची घोषणा, ‘या’ महान व्यक्तीचा चित्रपटातून उलगडणार जीवनप्रवास

अतिशय प्रतिभावान आणि आपल्या मुळाशी जोडलेला दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या उत्तम दिग्दर्शकीय सिनेमांमधून काही अभिनयातूनही आपल्या प्रतिभेचे सर्वच प्रेक्षकांना दर्शन घडवले आहे. नागराज यांचा सिनेमा म्हटल्यावर तो नक्कीच काहीतरी वेगळा आणि उत्तम असणार हे आधीच प्रेक्षकांना माहित असते. त्यामुळेच त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा नेहमीच केली जाते. सैराट, नाळ, झुंड आदी अतिशय वेगळ्या आणि पठडीबाहेरील सिनेमांमधून त्यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

आता नागराज यांच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. नुकतीच नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. एका मोठ्या सोहळ्यादरम्यान नागराज यांनी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. त्यांचा हा आगामी सिनेमा एका महान खेळाडूचा बायोपिक असणार आहे. इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये मागील अनेक काळापासून या सिनेमाबद्दल चर्चा होती, मात्र आता त्यांनी अधिकृतपणे याबद्दल जाहीर केले आहे.

नागराज यांच्या या आगामी सिनेमाचे नाव ‘खाशाबा’ असणार असून, हा सिनेमा हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या फ्रीस्टाइल कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. नागराज यांनी एका कार्यक्रमामध्ये खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची इच्छा प्रकट केली होती. आता या सिनेमात कलाकार कोण असणार, सिनेमा कधी येणार या आणि अशा अनेक प्रश्नाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या सिनेमासाठी आता प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मग मी भारत का सोडू?” म्हणत आमिर खानने दिले त्याच्या ‘त्या’ विवादित व्यक्तव्यावर स्पष्टीकरण

‘हे कठोर शासन नाही, अराजकता’ अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने साधला सरकारवर निशाणा

हे देखील वाचा