Saturday, August 2, 2025
Home मराठी नागराज मंजुळे नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या समोर, आगामी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

नागराज मंजुळे नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या समोर, आगामी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी त्यांच्या कामाने चित्रपटसृष्टीत खास अशी जागा निर्माण केली आहे. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत खास जागा निर्माण केली. त्यांच्या या चित्रपटाने १०० कोटीपेक्षाही जास्त गल्ला केला. हिंदीमध्ये देखील या चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये देखील चांगले नाव कमावले. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, नागराज मंजुळे आता वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. ते अमेझॉन प्राईमवर आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत.

नागराज मंजुळे (nagraj manjule) प्राईमवरील ‘अनपॉझ : नाय सफर’ वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत. या वेबसिरीजमधून एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. २१ जानेवारी रोजी ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार आहे. तसेच साकिब, श्रेया धन्वंतरी हे कलाकार दिसणार आहेत. त्यांच्या वेबसिरीजचा ट्रेलर सगळ्यांना खूप आवडला आहे. (nagraj manjule’s new webseries unpaused naya safar trailer released)

तसेच बॉलिवूड प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर आणि नागराज मंजुळे हे दोघे ‘मटका’ किंग या वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत. ही कहाणी सत्य घटनेवर आधारित असणार आहे. रतन खात्रीच जीवन देखील या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यांना ‘मटका’ म्हणजेच जुगार खेळाचा राजा मानत होते. त्यांच्या या दोन्ही वेबसिरीज पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

e

नागराज मंजुळे यांनी ‘नाळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटात काम देखील केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा