Saturday, September 7, 2024
Home टॉलीवूड ‘हे’ आहेत विजय सेतुपतिच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट, वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया संपूर्ण यादी

‘हे’ आहेत विजय सेतुपतिच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट, वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया संपूर्ण यादी

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपति आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. त्याने २०१० मध्ये आलेल्या ‘थेनमेरकु परुवाकात्रु’ या चित्रपटातून आपल्या तमिळ सिनेसृष्टीतील कारकिर्दिला सुरुवात केली होती. यानंतर त्याने एकापाठोपाठ एक दर्जेदार चित्रपटांत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. ज्यामध्ये ‘पिज्जा’, ‘नादुवाला कोंजाम’ ‘पक्काथा कानोम’ आणि ‘सुधु कव्वम’ या चित्रपटांचा समावेश आहे. विजयच्या या शानदार अभिनयासाठी त्याला तमिळनाडू राज्य फिल्म पुरस्कार तसेच चार राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. आज या सुपरस्टार अभिनेत्याचा ४४ वा वाढदिवस. या निमित्त आपण जाणून घेणार आहोत त्याच्या गाजलेल्या चित्रपटांबद्दल…

Super Deluxe – त्यागराजन कुमारराजा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा चार व्यक्तिंच्या भोवताली फिरते आणि त्यांच्या आयुष्यात एकाच दिवसात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. यामध्ये विजय सेतुपतिने शिल्पा नावाच्या एका तृतीयपंथी महिलेची भूमिका साकारली आहे. जिला लिंग बदलाच्या ऑपरेशननंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

Pizza – विजयचा आणखी एक प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘पिझ्झा’. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रेम्या लांबिसनने ही प्रमुख भूमिका साकारली आहे. यामध्ये सेतुपति एका पिज्जा डिलीवरी बॉयची भूमिका केली आहे, जो आपल्या प्रेयसीसोबत राहत असतो. एक दिवस जेव्हा त्याला आपला मालक काही हिरे लपवत असल्याच दिसत तेव्हा तो ते हिरे चोरण्याची योजना बनवतो आणि बंगल्याच्या चौफेर एक भयावह परिस्थिती निर्माण करतो, जिथे त्याने ते हिरे हरवल्याच दाखवल आहे.

Soodhu Kavvum – या चित्रपटात विजय सेतुपतिसह बॉबी सिन्हा, अशोक सेलवन, रमेश थिलक, संचिता शेट्टी आणि करुणाधरण मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये सेतुपतिने एका अपहरण करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याची भूमिका निभावली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.

Vikram Vedha – विजयचा अलिकडच्या काळातला लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे विक्रम वेधा. या चित्रपटाच दिग्दर्शन पुष्कर- गायत्रीने केल आहे. चित्रपटात माधवन, श्रध्दा श्रीनाथ आणि विजय सेतुपति मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटात विजयने एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे.या भूमिकेच सर्वत्र कौतुक झाल होत. लवकरच हा चित्रपट हिंदीमध्ये येणार आहे. ​
हेही वाचा :
author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा