Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

शस्त्रक्रियेनंतर नकुल मेहताला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

‘बडे अच्छे लगते हैं २’ फेम अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) नुकताच आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नकुलने गुरुवारी (२ जून) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, चाहत्यांना त्याच्या तब्येतीची माहिती दिली होती. नकुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत पडले होते. नकुलवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो आता बरा झाला आहे. नकुलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नकुलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला, तर तो ८ ते १० जून दरम्यान कामावर परतणार आहेत. (nakuul mehta discharged from hospital shares post on social media)

अपेंडिक्सचे करण्यात आले ऑपरेशन
रिपोर्टनुसार, नकुलला मुंबईतील सुजॉय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, नकुलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्याला ५ ते ७ दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.

अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
नकुलने पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना सांगितले की, त्याचे ऍपेंडिक्सचे ऑपरेशन झाले आहे. त्याने लिहिले, “माझी आई नेहमी म्हणायची की, आयुष्य चॉकलेटच्या बॉक्ससारखे आहे. तुम्हाला काय मिळणार आहे, हे कधीच माहीत नाही. २४ तासांच्या कालावधीत सेलिब्रेशनवरून मी रुग्णालयात दाखल झालो. मला वाटले कामावर परिणाम होणार आहे, पण पुन्हा आयुष्याने दुसरंच काहीतरी ठरवलंय.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नकुल मेहता ‘नेव्हर किस योर बेस्टफ्रेंड २’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. सध्या तो दिशा परमारसोबत टीव्ही शो ‘बडे अच्छे लगते हैं २’ मध्ये दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा