निळे डोळे, गोरा चेहरा… अभिनेता नकुलच्या ७ महिन्यांच्या मुलाची क्यूटनेस पाहून तुम्हीही व्हाल फिदा

अभिनेता नकुल मेहता आणि जानकी पारेख सात महिन्यांपूर्वीच आई- बाबा झाले आहेत. त्यांनी हा आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला. आता त्यांचा मुलगा सात महिन्यांचा झाला आहे. सात महिन्यांचा झाल्यामुळे त्याचा पहिला व्हिडिओ नकुलने शेअर केला आहे. या व्हिडिओतील नकुलच्या लाडक्या लेकाच्या क्यूटनेसमुळे सर्वजण त्याच्यावर फिदा झाले आहेत. निळे निळे डोळे आणि गोरा गोरा चेहरा पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याच्यावर फिदा आले आहेत. या सात महिन्यांच्या मुलाचे नाव नकुलने ‘सूफी’ ठेवले आहे.

हा सूफीचा अनेक वेगवेगळ्या फोटोनी एक कोलाज केलेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नकुल मेहताने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूफीची निरागसता आणि क्यूटनेस दिसून येत आहे. तसेच तो खूप आनंदी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

हा कोलाज व्हिडिओ शेअर करताना नकुल मेहताने लिहिले की, “मी सूफी आहे आणि मी सात महिन्यांचा आहे. शेवटी तुम्हाला भेटून खूप छान वाटले.” याआधीही नकुलने मुलाचे अनेक फोटो शेअर केले होते, पण प्रत्येक वेळी त्याचा चेहरा लपवला गेला होता. आता नकुलने मुलाचा चेहरा दाखवला आहे.

येत आहे ‘बडे अच्छे लगते हैं २’
नकुल मेहताबद्दल बोलायचं झालं, तर तो वडील झाल्यापासून खूप आनंदी आहे. त्याचप्रमाणे सध्या तो ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकांमध्ये दिसत आहे. ही मालिका ३० ऑगस्टलाच सुरू झाली आहे. ज्यात पुन्हा एकदा त्याची जोडी दिशा परमारसोबत जमली आहे. दोघांची जोडी पुन्हा खूप पसंत केले जात आहे. याआधी ‘दोघेही प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेमध्ये एकत्र दिसले होते. तसेच चाहत्यांनाही त्यांचे काम खूप आवडले होते. दोघांचा हा पहिला शो होता, जो सर्वांना खूप आवडला. बऱ्याच वर्षांनंतर आता पुन्हा ही जोडी छोट्या पडद्यावर दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

Latest Post