Saturday, June 29, 2024

अशोक सराफ यांचे पाय चेपल्यानंतर नाना पाटेकर यांना मिळायचे ‘इतके’ पैसे, स्वतः नानांनीच केला खुलासा

मराठी मनोरंजनविश्वातील खरे कोहिनुर म्हणून अनेक दिग्गज कलाकारांना ओळखले जाते. यातलेच दोन नावं म्हणजे अशोक सराफ आणि नाना पाटेकर. या दोघांनी मराठी सिनेसृष्टीला आपल्या प्रतिभेने मोठी भरारी दिली. या दोन नावांशिवाय ही इंडस्ट्री नेहमीच अपूर्ण असणार हे नक्की. मात्र तुम्हाला माहित आहे का की, अशोक सराफ आणि नाना पाटेकर हे खूपच जवळचे मित्र आहेत, आणि अशोक सराफ यांनी नानांना त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात खूप मदत केली आहे.

नाना पाटेकर यांनी अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये, मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये गाजत असतात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मैत्रीचे काही किस्से आणि काही आठवणी सांगणार आहोत.

एका कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांच्याबरोबरच्या काही आठणींना उजाळा दिला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेसृष्टीत नवे असताना अशोक सराफ यांनी नानांना कशा प्रकारे मदत केली हे ते यात सांगताना दिसत आहेत. एकदा नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात नाना यांना अशोक सराफ यांच्या तुलनेत कमी पैसे मिळायचे. तेव्हा अशोक सराफ हे मुद्दाम नाना यांच्यासमोर पत्त्यांमध्ये ५/१० रुपये हरायचे.

नाना यांनी सांगितले की, गणपती आले होते, तेव्हा नानांकडे त्यासाठी पैसेच नव्हते. अशावेळी अशोक सराफ हे घरी येऊन नानांना एक कोरा चेक देऊन गेले. आणि त्यांना म्हणाले, “15 हजार बँकेत आहेत. तुला पाहिजे तेवढे पैसे काढून घे.” त्यानंतर त्यांनी 3 हजार रुपये बँकेतून काढले होते. त्या पैशांबद्दल अशोक सराफ यांनी नानांना कधीच काहीही विचारले नाही”.

नाना आणि अशोक सराफ यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दरम्यानची एक आठवण नाना यांनी सांगितली ते म्हणाले, “आमच्या नाटकाच्या दौऱ्यात मी नेहमीच अशोकचे पाय चेपायचो आणि डोक्याला तेल लावून द्यायचो. त्याचे तो मला पाच रूपये द्यायचा. आता देखील भेटला मला की मी त्याचे पाय चेपायला जातो. तेव्हा तो मला, ऐ नाना गाढवा, म्हणत दूर करतो”.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील ‘या’ मराठी कलाकारांनी पाडलीये छाप

हे देखील वाचा