दक्षिण भारतीय अभिनेते नंदमुरी बालकृष्ण (Nandmuri Balkrushn) यांचा ‘डाकू महाराज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात ११५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट २०२५ सालातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा भारतीय चित्रपट बनला आहे. चित्रपटाच्या यशाने आनंदी असलेले अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी त्याच्या संगीत दिग्दर्शकाला एक अद्भुत भेट दिली आहे.
या अभिनेत्याने अलीकडेच ‘डाकू महाराज’ या गाण्याचे संगीत दिग्दर्शक थमन एस. यांना एक अद्भुत सरप्राईज दिले. चित्रपटाच्या यशानंतर कौतुकाचा प्रतीक म्हणून नंदामुरीने त्याला एक नवीन आलिशान पोर्श कार भेट दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लक्झरी कारची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे गाडीसह असलेले फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
‘डाकू महाराज’ चित्रपटाच्या संगीतानेही चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. उर्वशी रौतेला आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत चित्रित केलेले दाबी-दिबिडी हे गाणे देखील वादात सापडले आहे. या गाण्याच्या स्टेप्समुळे सोशल मीडियावर ते खूप ट्रोल झाले. नंदामुरीवर नेटकऱ्यांनी टीकाही केली. हे गाणे स्वतः थमन यांनी संगीतबद्ध केले आहे.
नंदमुरी बालकृष्ण व्यतिरिक्त, ‘डाकू महाराज’मध्ये उर्वशी रौतेला, बॉबी देओल, प्रज्ञा जयस्वाल, ऋषी, चांदनी चौधरी, प्रदीप रावत, सचिन खेडेकर आणि रवी किशन यांच्याही भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सैनिकांचा अपमान केल्याच्या तक्रारीवरून एकता कपूरच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
‘माझ्या आईच्या दवाखान्यात लोक पेशंट बनून येतात’; रणवीर अलाहाबादीयाची पोस्ट व्हायरल