Saturday, May 23, 2026
Home अन्य पॉर्न रॅकेट चालवण्याच्या आरोपात अभिनेत्रीला अटक; मॉडेल्सकडून बळजबरीने शूट केले जायचे अश्लील व्हिडिओ

पॉर्न रॅकेट चालवण्याच्या आरोपात अभिनेत्रीला अटक; मॉडेल्सकडून बळजबरीने शूट केले जायचे अश्लील व्हिडिओ

राज कुंद्राचे अश्लील चित्रपटांचे प्रकरण आणि त्याला झालेली अटक आणि अनेक अभिनेत्रींचे या प्रकरणात आलेले किंबहुना येणारी नावे हे प्रकरण ताजे असतानाच कोलकातामध्ये देखील पोलिसांनी एका मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या ३० वर्षीय नंदिता दत्ताला पॉर्न सिनेमे तयार करण्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे.

एका मोठ्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार नंदिता दत्तासोबत तिचा साथीदार मैनाक घोष याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर आरोप लावण्यात आला आहे की, यांनी नव्या मुलींना वेबसिरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून आणि धमकावून जबरदस्तीने पॉर्न सिनेमा शूट करायचे. नंदिता स्वतः पॉर्न चित्रपटांमध्ये काम करायची. या अशील सिनेमांमध्ये तिचे नाव नॅन्सी भाभी होते. नंदिता दत्ता आणि मैनाक यांना २६ जुलै २०२१ रोजी दोन तरुण मॉडेल्सने तक्रार दाखल केल्यानंतर, त्यांना पोलिसांनी त्यांच्या घरून अटक केली आहे. (nandita dutta arrested For Running Porn Racket In Kolkata)

या तरुणींनी सांगितले आहे की, बैलीगंज येथे असणाऱ्या एका स्टुडिओमध्ये बळजबरीने आमच्याकडून न्यूड व्हिडिओ शूट केले गेले. त्यांनी हे देखील सांगितले की, शहरातील न्यू टाऊन हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणीकडून बळजबरीने एक अडल्ट व्हिडिओमध्ये काम करून घेतले.

पोलिसांच्या एका सिनियर अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, “आम्ही सर्व नंदिता दत्त्ता आणि मैनाक यांची चौकशी करत असून, त्यांच्या इतर साथीदारांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सोबतच हे पॉर्न व्हिडिओ कुठे, कधी शूट केले जायचे, कुठे विकले जायचे आणि कोणी मोठे लोकं यात सामील आहे का? ही देखील माहिती मिळवत आहोत.

नंदिता दत्ता विषयी अधिक सांगायचे झाल्यास, ती या व्यवसायात आधीपासूनच होती. या क्षेत्रात नवनवीन मॉडेल्स देखील ती आणायची, त्याच्याकडून पॉर्न सिनेमे बनवून घ्यायची. सुरुवातीला नॉर्मल बोल्ड सीन्स असणारे सिनेमे तयार केले जायचे, नंतर जास्त पैशांचे आमिश दाखवून पॉर्न बनवले जायचे. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असून, ती तिचे अनेक उत्तेजक फोटो नेहमी पोस्ट करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा