आयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज दुपारी संपन्न झाला . या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाॅलिवूडचे शहंशाह आणि साउथचे सुपरस्टार रजनीकांतदेखील पोहोचले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींनी भाषण दिले. त्यानंतर ते या दोन्ही दिग्गज कलाकारांना भेटले . पंतप्रधान नरेद्र मोदींनी मंदिर परिसरात रजनीकांत आणि अमिताभ यांची विचारपुस केली.
पीएमने घेतली ‘बिग बीं’ची भेट
अमिताभ बच्चन(amitabh bachchan) आज पहाटे त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनसोबत(Abhishek bachchan) आयोध्येला पाहोचले. दोघेही आयोध्येत सर्व स्टारससोबत भव्य कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमानंतर पीएम मोदींनी बिग बी ची भेट घेतली. समोर आलेल्या फोटोंमधून पीेएम त्यांच्या तब्बेतीबद्दल विचारत असल्याचे दिसून येत आहे. तर बिग बी देखील पीएम मोदींचं अभिनंदन करताना दिसले.
रजनीकांतच्या प्रकृतीची केली विचारणा
अमिताभ बच्चनसोबतंच साउथ सुपरस्टार रजनीकांत देखील आज झालेल्या भव्य प्राणप्रतिष्ठा(pran pratishtha) सोहळ्याचे साक्षीदार बनले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर पीएम मोदींनी रजनीकांतची( rajinikanth) देखील भेट घेतली . पीएम हातवारे करुन रजनीकांतच्या प्रकृतीबाबत विचारत होते. तर रजनीकांत हात जोडुन पीएमचं अभिनंदन करताना दिसले. प्राणप्रिष्ठेनंतर पीएम मोदी(narendra modi) कुबेर टीळा येथे गेले.
हे सेलिब्रिटीही होते हजर
आजच्या भव्य कार्यक्रमात साउथ स्टार राचरणसुद्धा सहभागी झाले होते.रामचरणसोबत त्यांचे पिता चिरंजीवींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या व्यतिरिक्त बाॅलिवूड जगतातील अनेक प्रसिद्ध हस्तींनी आज या कार्यक्रमाला हजेरी लावली. यांमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, आयुष्मान खुराना, विक्की कौशल, कैटरीना, माधुरी दीक्षितसोबतंच अनेक गायक आणि चित्रपट दिग्दर्शकदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.