Wednesday, July 3, 2024

क्रिकेटर हार्दिक पंड्याची पत्नी अभिनेत्री नताशाचा धमाकेदार व्हिडीओ पाहिलाय का? पाहा कोणत्या गाण्यावर केलाय डान्स

आयपीएलच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरवात झाली आहे. ९एप्रिल पासून सुरु झालेली ही स्पर्धा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हार्दिक पंड्या आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी शानदार प्रदर्शन करत आहे. हार्दिकबरोबर त्याची पत्नीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तीच्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. सध्या चेन्नईत असलेली हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकही या दिवसांत इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर पोस्ट करताना दिसत आहे.

नताशाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत. नताशाने जलतरण तलावावरील तीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिची प्रत्येक पोस्ट व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावर स्लो मोशन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता. ती चेन्नईमधील एका हॉटेलच्या प्रायव्हेट बीचवर हे शुट करत होती.

त्याचबरोबर नुकताच नताशाचा एक मस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. इंस्टाग्राम रीलबाबत आजकाल लोकांचा कल वाढत आहे. यामध्ये कलाकारही सहभागी आहेत. अमेरिकन रॅपर कार्डी बी के याच्या रॅपवर नाचणे लोक पसंत करत आहेत. हे इंस्टावर बरेच ट्रेंडही करत आहे. नताशासुद्धा या गाण्यावर नाचताना दिसली. चाहत्यांसह सेलेब्रीजही तिच्या नृत्याचे कौतुक करीत आहेत. कार्डी बी एक अमेरिकन रॅपर, गीतकार आहे. तिला सर्वश्रेष्ठ रॅप अल्बमसाठी ग्रॅमी पारितोषिक मिळाले आहे.

नताशाबद्दल बोलायचे झाले तर ती एक सर्बियन नर्तिका व मॉडेल आहे. ‘सत्याग्रह’ चित्रपटातून तीने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. परंतू तीला खरी ओळख मिळाली ती ‘डीजेवाले बाबू’ या गाण्यामुळे. याचबरोबर ‘नच बलिये’ या रियॅलिटी शोच्या माध्यमातूनही तीने मोठी लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर नताशाला मोठे फॅन फॉलोविंग आहे.

हे देखील वाचा