Friday, April 25, 2025
Home अन्य फक्त 23 सप्टेंबरच नाही, तर ‘या’ तारखेपर्यंत घेऊ शकता 75 रुपयांत सिनेमाची मजा; एका क्लिकवर घ्या जाणून

फक्त 23 सप्टेंबरच नाही, तर ‘या’ तारखेपर्यंत घेऊ शकता 75 रुपयांत सिनेमाची मजा; एका क्लिकवर घ्या जाणून

राष्ट्रीय सिनेमा दिना‘निमित्य मल्टीप्लेक्स सिनेमागृहात अद्भुत दृष्य बघायला मिळाले. चित्रपटाचे तिकीट 75 रुपयात घेऊन जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपट पाहायला गेले. केवळ 75 रुपयांत सिनमागृहात प्रवेश मिळाल्याने कदाचित चित्रपटगृह हाउसफुल झाले आहेत.

केवळ 75 रुपयात सिनेमागृहात प्रवेश
‘राष्ट्रीय सिनेमा दिना’च्या (National Cinema Day) चांगल्या प्रभावामुळे काही मल्टीप्लेक्स सिनेमागृहांनी निर्णय घेतला की, येणाऱ्या 26 स्पटेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत 75 रुपये दराने तिकीट विकून सिनेमागृहात प्रवेश देण्यात येईल. काेराेना काळानंतर राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्य मल्टीप्लेक्सवर भरपूर संख्येत प्रेक्षकांची हजेरी पहायला मिळाली. जे की, मल्टीप्लेक्सच्या मालकांसाठी आनंदाची बाब हाेती. अशात देशातील माेठ्या- माेठ्या मल्टीप्लेक्सने याेजना बनवली की, अजून आणखी काही दिवस ते 75 रुपयांच्या तिकिटामध्ये सिनेमागृहात प्रवेश देतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by MovieMax Cinemas (@moviemaxofficial)

माध्यमांतील वृत्तांनुसार, नवीन मल्टीप्लेक्स श्रृंखला मूवीमॅक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवरून घाेषणा केली की, मल्टीप्लेक्सच्या तिकीटांची सुरुवात 70 रुपये पासून हाेईल. मात्र, काही सिनेमागृहात तिकिटांची किंमत 100  रुपये ठेवण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आयनॉक्स लीजर लिमिटेडचे एवीपी पुनीत गुप्ता यांनी या गाेष्टीची पुष्टी केली की, सर्व आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्यांना गुरुवारपर्यंत चित्रपटाचे तिकीट केवळ 112 रुपयात उपलब्ध हाेईल.

हेही वाचा- ‘ब्रह्मास्त्र’च्या डायरेक्टरने थेट ‘आयरन मॅन’शी केली शाहरुखची तुलना, पण का? घ्या जाणून

सिनेपॉलिस इंडिया मल्टीप्लेक्स फक्त 100 रुपयात उपलब्ध करणार तिकिटे
माध्यमांतील वृत्तांनुसार, कार्निव्हल सिनेमाचे सीईओ विशाल साहनीने घाेषणा केली की, राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त आमच्यासाठी यशस्वी प्रयाेग हाेता. सिनेमागृह प्रेक्षकांनी भरले हाेते आणि तिकिटांचा पण खूप लवकर खप झाला. राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या महोत्सवाला चालू ठेवत भारतातील सर्व सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत 75 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत तिकिटे सहज मिळून जातील. या व्यतिरिक्त सिनेपाॉलिस इंडिया मल्टीप्लेक्स देखील 100 रुपयांपासून चित्रपटांची तिकिटे उपलब्ध करून देईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! अली- रिचाच्या लग्नात फोन घेऊन जाण्यास परवानगी, पण ‘ही’ अट करावी लागेल मान्य
ब्रेकअप! ‘बिग बॉस 15’मधील प्रसिद्ध जोडी कायमची झाली वेगळी, सोशल मीडियावरून दिली माहिती

 

हे देखील वाचा