राडाच ना भाई! 75 रुपयांच्या तिकिटांमुळे सनीच्या सिनेमाचे निर्माते मालामाल; छापले ‘एवढे’ कोटी

0
521
Sunny-Deol
Photo Courtesy: Instagram/iamsunnydeol

राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून सनी देओल याचा ‘चुप‘ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात सनीव्यतिरिक्त दुलकर सलमान आणि पूजा भट्ट यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट दिनामुळे दमदार कमाई केली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमानंतर आता ‘चुप’ हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय.

राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या दिवशी सिनेमाचे तिकीट 75 रुपये ठेवण्यात आले होते. यामुळे देशभरातील चित्रपटगृह हाऊसफुल झाले. यामुळे सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सनी देओल (Sunny Deol) याने दीर्घ काळानंतर ‘चुप’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी 2.60 ते 3.20 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

‘चुप’ सिनेमाला स्वस्त तिकिटांचा फायदा
महत्त्वाचं म्हणजे, ‘चुप’ या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगने निर्मात्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणला होता. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, 1 लाख 25 हजार तिकिटांची बुकिंग 22 सप्टेंबर रोजीच झाली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या दिवशी 4 लाख तिकिटांची विक्री झाली होती. सिनेमाबद्दल प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिकिटांच्या दरामध्ये कमी झाली नसती, तर कदाचित या सिनेमाला कोट्यवधी रुपयांची कमाईदेखील करता आली नसती.

‘चुप’ सिनेमात अमिताभ बच्चन यांचा सूर
आर बाल्की यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘चुप’ या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी बनवलेल्या सुराचा वापर करण्यात आला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, “‘मी रचलेला एक मधुर सूर. आशा आहे की, उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे या सूराची एक छोटीशी कथा असेल. आर बाल्की यांचा ‘चुप’ हा सिनेमा नुकताच पूर्ण झाला असून सिनेमाचा शेवट छोटा करण्यात आला आहे.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, हा सिनेमा 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. हा सिनेमा आणखी किती कोटी रुपयांची कमाई करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले
म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here