Wednesday, July 3, 2024

खरंच की काय? आर्यन खान आणि नव्या नवेलीचं होतं अफेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतात सेलिब्रेटी म्हटलं की त्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचे लक्ष असते, यात त्यांची मुलं अर्थात स्टार किड्सवरही लक्ष असत. त्यांच्या बातम्याही अनेकादा झळकत असतात. तर कधी ते त्यांच्या फोटोंमुळे. सोशल गॅदरिंगमुळे चर्चेत असतातच. कधी कधी स्टार किड्सच्या अफेअरवरही चर्चांना उधाण येते. अशाच स्टार किड्सच्या यादीत शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan)आणि अमिताभ बच्चन (amitabh bachchan)ची नात म्हणजेच श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा यांचाही समावेश आहे बरं का. दोघेही विविध कारणांनी चर्चांचा विषय आजपर्यंत ठरलेले आहेत. त्यातच सोशल मीडियामुळे तर अनेकदा त्यांचे वेगवेगळे फोटो लिक होत असतात. पण जर असं सांगितलं की या दोन स्टार किड्सच्या अफेअरच्या चर्चांनीही एकेकाळी उधाण आले होते…तर कदाचीत तुम्ही चकीत व्हाल होना… पण आपण जरा याबद्दल आज खोलात जाऊनच जाणून घेऊ…

त्याच काय आहे की, आर्यन खान आणि नव्या नवेली नंदा हे दोघेही शिक्षण घेत असताना एकाच वर्गात होते, तसेच ते लंडनमध्येही एकत्र शिकायला होते. त्याचमुळे त्यांच्यातील मैत्री चांगली आहे. असं अनेक रिपोर्ट्स सांगतात. त्यांच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीचेही काही फोटो व्हायरल झाले होते. इतकंच नाही, तर अनेकदा त्या दोघांचे वेगवेगळे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते दोघेही एकत्र अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रीणींबरोबर पार्टी करतानाही दिसले आहेत… अशा पार्टींमधील फोटोही अनेकदा चर्चेचा विषय ठरलेत… त्याचमुळे या दोघांमध्ये अफेअर आहे का वैगरे चर्चांना उधाण आले होते…

त्यातच रिपोर्ट्सनुसार काही वर्षांपूर्वी एक एमएमएस व्हायरल झाला होता, ज्यात आर्यन आणि नव्या असल्यासारखे दिसत होते… मात्र नंतर तो एमएमएस खोटा असल्याचे सिद्ध झाले… तसेच या दोघांमध्ये कोणतेही अफेअर नसल्याचेही समोर आले… पण हे नक्की की आर्यन आणि नव्या चांगले मित्र मात्र आहेत… अन्य स्टार किड्समध्ये ज्याप्रकारे चांगली मैत्री आहे, तशी आर्यन आणि नव्यामध्येही आहे, असं म्हटलं जातं…

सध्या हे दोघेही आपापले करियर घडवण्याच्या प्रयत्नात आहेत… असं म्हटलं जात होतं की या दोघांनाही त्यांच करियर बॉलिवूडमध्ये घडवायचं आहे, पण नव्याला तिच्या वडीलांच्या बिझिनेसमध्ये लक्ष द्यायचं असल्याचे म्हटले जात आहे… ती आरा हेल्थ नावाच्या कंपनीची कोफाऊंडर असून यातून महिलांना असलेल्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरन करण्याचा प्रयत्न आहे. तसेच आर्यन खानबद्दल सांगायचं झालं तर त्याला फिल्ममेकींगमध्ये करियर करायच असल्याची चर्चा आहे… त्याने २०१९ मध्ये आलेला द लायन किंग या ऍनिमेटेड चित्रपटात सिंबा या कॅरेक्टरला त्याचा आवाज दिला होता, ज्याचे प्रचंड कौतुकही झाले होते… तसेच अनेकांना हे माहित नाही की, कभी खुशी कभी गम चित्रपटात आर्यन खान ज्यूनियर शाहरुख खानच्या भूमिकेत दिसला होता… तर मंडळी, आर्यन आणि नव्या यांच्यात रिलेशन असो वा नसो, पण त्यांच्यात चांगली मैत्री तर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा