Friday, July 5, 2024

Aaradhya Bachchan: ‘ती खुप समजूतदार…’, अन् नव्या नवेली नंदाने केलं आराध्याचं कौतुक

गेल्या काही दिवसांपासून बिग बी यांची मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda ) या दोघी ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या पॉडकास्टचा पहिला एपिसोड चांगलाच चर्चेत राहिली. नव्याच्या या पॉडकास्ट शोमध्ये आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनदेखील सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, एका मुलाखतीत नव्याने बहिण आराध्यावर (Aaradhya Bachchan ) भाष्य केलं आहे.

बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्याची(Aaradhya Bachchan ) एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. अशातच तिची आत्ये बहिण नव्या तिच्यासंदर्भात पहिल्यांदाच बोलली आहे.

नव्या म्हणाली, आराध्या इतकी मॅच्युअर आहे की तिला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. ती खूप हुशार आहे. “मी तिला कोणता सल्ला द्यावा की नाही हे मला माहीत नाही. मला वाटते की, ती तिच्या वयोमानापेक्षा अधिक समजूदार आहे. जेव्हा मी १२ वर्षाची होते तेव्हा मी स्वतः इतकी हुशार नव्हते. आराध्या सध्या १२ वर्षाची आहे. आराध्या खुप हुशार आहे. विशेष म्हणजे ती या वयात तिच्या सभोवतालच्या जगाविषयी खुप जागरूक आहे. याचा फार आनंद होतो. तिचं या गोष्टीबद्दल मला फार कौतुक वाटतं.

तसेच नव्या पुढे म्हणाली, मी तिची मोठी बहीण म्हणून खुप गोष्टी तिच्याशी शेअर करते. पण तिला कोणता सल्ला देऊ शकेन असं वाटतं नाही. आराध्या खूप आत्मविश्वासू आहे. जे काही घडतं त्याची तिला पुरेपुर जाणीव आहे. त्यामुळं तिला कोणाता सल्ला देण्याची गरज नाही.

हेही वाचा:

Jaya Bachchan : ‘माझं ते स्वप्न अपूर्णच…’ वयाच्या ७५ व्या वर्षी जया बच्चन यांनी व्यक्त केली खंत

‘मला माझ्या आईच्या त्या सवयीचा त्रास होतो’; श्वेताने जया बच्चनबद्दल केला मोठा खुलासा

हे देखील वाचा