Monday, September 28, 2026
Home › बॉलीवूड › ‘मला माझ्या आईच्या त्या सवयीचा त्रास होतो’; श्वेताने जया बच्चनबद्दल केला मोठा खुलासा

‘मला माझ्या आईच्या त्या सवयीचा त्रास होतो’; श्वेताने जया बच्चनबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan)सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. जया बच्चन यांना राग पटकन येतो. त्यामुळे अनेकदा त्या पापाराझींवरही संतापल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये त्यांचं आणि त्यांच्या लेकीचं श्वेताचं कॅमेरासमोर शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता एका शोमध्ये श्वेतानं जया बच्चन यांच्या कोणत्या गोष्टी आवडतं नाहीत याचा खुलासा केला आहे.

श्वेता बच्चन सध्या आपली मुलगी नव्या नवेली नंदासोबत पॉडकास्ट शो ‘व्हाट द हेल नव्या’ होस्ट करतीय. या पॉडकास्टमध्ये या दोघींसोबत जया बच्चनदेखील सहभागी होतात. नुकतचं शोच्या नव्या एपिसोड प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये श्वेता आपली आई जया बच्चन यांच्या न आवडत्या गोष्टीबद्दल सांगताना दिसते.

पॉडकास्ट शो ‘व्हाट द हेल नव्या’ मध्ये तिची मुलगी नव्याने श्वेताला विचारले की, तुला आजीची अशी कोणती गोष्ट आहे जी आवडत नाही? यावर उत्तर देताना श्वेता म्हणाली, आई जेव्हा जेव्हा केसांना कांद्याचा रस लावते तेव्हा मला त्याच्या वासाचा मला खुप त्रास होतो. संपुर्ण घरात कांद्याचा वास पसरतो. तिची ही सवय मला नाही आवडतं. तसेच ती पुढे म्हणाली, आई लहान मुलांसारखं झोपते. थोडा जरी आवाज झाला तरी पटक जागी होते. यावर नातं नव्या म्हणाली, आजी दुसऱ्या दिवसाचा विचार करत असते. त्यामुळे लगेच जागी होते.

काही दिवसांपूर्वी या पॉडकास्टचा एक एपिसोड व्हायरल झाला होता. त्यामध्ये जया बच्चन सहभागी झाल्या होत्या. पण संवाद साधताना दोघींमध्ये वाद झाल्याचे समोर आले. नव्या, जया यांच्यासोबत भारतीय महिला वैज्ञानिकांविषयी भाष्य करताना दिसत आहे. या महिलांनी कसं घर, संसार सांभाळत त्यांच्या करिअरमध्येही यश मिळवलं हे ती सांगत आहे. यावेळी, ‘त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदरभाव आहे’, असं जया बच्चन सांगतात. यामध्येच श्वेताने तिचं मत मांडलं आणि तिचं आईसोबत भांडण झालं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीर कपुरने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘माझ्यासाठी मुकेश अंबानी…’
जीवन आणि सिफ्रा एकत्र पडद्यावर दिसणार का? चाहत्यांच्या प्रश्नाला क्रिती सेननने दिले मजेशीर उत्तर

हे देखील वाचा