Monday, July 1, 2024

अमिताभ बच्चनची नात दिसली ट्रॅक्टर चालवताना, ग्रामीण महिलांची ‘या’ कारणास्तव घेतली भेट

मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बिग बी आणि बच्चन कुटुंबातील इतरांसारखी अभिनेत्री नाही, पण बिझनेस वुमन बनून ती नक्कीच लोकांची मने जिंकत आहे. नव्या ही वुमन सेंट्रिक हेल्थ कंपनीची सह-संस्थापक आहे. अशात नव्याने नुकताच तिचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर चाहते काैतुकाच वर्षाव करत आहेत.

नव्या ( navya naveli nanda) सध्या गुजरातमधील एका गावात आहे, जिथे ती स्थानिक लोकांची भेट घेट आहे. इतकंच नाही तर, नव्या झाडाखाली बसून गावकरी लाेकांशी चर्चा करत त्यांच्याशी चांगला वेळ घालवत आहे. यासाेबत नव्याने ट्रॅक्टरही चालवला आहे. अशात बिग बींची नात असूनही, सामान्य लोकांमध्ये वेळ घालवण्याची नव्याची साधी पद्धत पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. काहींनी तिच्या नम्र स्वभावाचे कौतुक केले, तर काहींनी तिचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

नव्याच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, ‘तुम्ही ज्या प्रकारे लोकांना सपोर्ट करत आहात ते कौतुकास्पद आहे.’, तर आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘तू सर्वात वेगळी स्टार किड आहेस.’ अशात एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक आहात हे पाहून बरे वाटले. माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by IVM Podcasts (@ivmpodcasts)

विशेष म्हणजे, याआधी नव्याने एक पॉडकास्ट सुरू केला होता, ज्यामध्ये ती जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्यासोबत बच्चन कुटुंबातील न ऐकलेल्या गोष्टी लोकांसमोर आणात असे. या पॉडकास्टचा प्रवास आता संपला आहे, परंतु चाहत्यांना तिची होस्टिंग स्टाइल आणि कॉन्फिडेंस आवडला.( navya naveli nandad rive tractor in village in gujarat )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Birthday | ‘जनता गॅरेज’पासून ते ‘आरआरआर’पर्यंत, ‘या’ चित्रपटांनी ज्युनियर एनटीआरला बनवलं सुपरस्टार
दुःखद! ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचे निधन वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा