Thursday, May 23, 2024

नव्या नवेली नंदा सिद्धांतला करतेय डेट? बिग बींची नात दिसली अभिनेत्याच्या घराबाहेर

बाॅलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘फोन भूत‘ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर देखील मुख्य भूमिकेत आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा हि सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची माहिती समाेर येत आहे. मात्र, दाेघांनीही अधिकृतरित्या याबाबत काेणतीही माहिती दिली नाही. 

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) आणि नव्या नवेली नंदा (navya naveli nanda ) जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट्स हाेतात. तेव्हा पॅपराझी अनेकदा त्यांना एकमेकांची नावे घेऊन चिडवतात. माध्यमातील वृत्तानुसार, शुक्रवारी (दि.11 नाेव्हेंबर)ला नव्याला सिद्धांतच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आले. नेमकी नव्या सिद्धांतला भेटायला गेली हाेती की, अजूण कुणाला हे सांगता येणार नाही.

यावेळी नव्या नवेली नंदा पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसली, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने खूप हलका मेकअप केला होता आणि तिचे केस माेकळे साेडले होते. अलीकडेच, ‘फोन भूत’ च्या प्रमोशनदरम्यान, सिद्धांतला त्याच्याबद्दलची एक अफवा शेअर करण्यास सांगितले जी प्रत्यक्षात खरी आहे.

यानंतर सिद्धांत चतुर्वेदी अप्रत्यक्षपणे नव्या नवेली नंदासोबतच्या डेटिंग अफवेबद्दल बोला. तो म्हणाला, “मी डेट करत आहे, कोणालातरी पाहत आहे. कदाचित ते खरं हाेईल.” गेल्या अनेक महिन्यांपासून बातम्या येत आहेत की, सिद्धांत आणि नव्या नवेली एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, ते दोघेही पार्टीत वेगवेगळे पोहोचले हाेते.(bollywood navya naveli nanda spotted outside of actor siddhant chaturvedi house)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियंका चौधरीच्या नॉमिनेशनवर प्रेक्षकांनी ठोकला अंदाज, ‘बिग बॉस’TRP साठी का निर्मात्याने लढवली शक्कल?

वेस्टर्न लूकमध्ये तेजश्रीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

हे देखील वाचा