Wednesday, June 26, 2024

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला नवाजवर मोठा आरोप, मध्यरात्री मुलांसह काढले तिला घराबाहेर

नवाजुद्दीन सिद्धीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात जे घरगुती भांडण होतो ते आता जगासमोर आले आहे. मागील बरीच काळापासून या दोघांमध्ये मोठा वाद सुरु आहे. आलिया नेहमीच सोशल मीडियावरून नवाजच्या विविध वागणुकीबद्दल खलास करत आहे. मात्र यावर अजूनही नवाजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच आता त्याच्या पत्नीने आलियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. आलियाने रात्री ११.३० वाजता तिला नवाजने घरातून बाहेर काढल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

आलियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिचे दोन मुलं देखील दिसत असून, ती रस्त्यावर उभी आहे. या व्हिडिओमध्ये आलिया सांगते की, “मी आता नवाजच्या बंगल्यासमोर उभी आहे. आम्हाला या बंगल्यातून बाहेर काढण्यात आले आहे. ती माझी मुलगी रडत उभी आहे. आता मला समजत नाही काय करायचे ते माझ्याकडे ८१ रुपये आहे. माझ्याकडे ना हॉटेल आहे ना घर.मी काय करू कुठे जाऊ? नवाज इतका खालच्या पातळीवर एल आहे की मी कधी विचारही केला नव्हता. मी कधीच तुला माफ करणार नाही नवाज माझ्या मुलांसोबत जे होतो ते पाहून मी तुला कधीच माफ करणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे आहे नवाजुद्दीन सिद्दीकीचे खरे रूप, त्याने त्याच्या निष्पाप मुलांना देखील नाही सोडले. वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला बोलावल्यामुळे मी ४० दिवस घरात राहिल्यानंतर बाहेर पडले होते. पण जेव्हा मी घरी परतले तेव्हा मी माझ्या मुलांसह आत येऊ नये म्हणून नवाजुद्दीनने गार्ड्स नेमले होते. मला आणि माझ्या मुलांना या माणसाने क्रूरपणे रस्त्यावर सोडून दिले आहे.”

पुढे आलियाने लिहिले की, “तुझी पीआर एजन्सी खोटी माहिती पसरवत आहे. तुच नेमलेले तुझ्याकडून पगार घेणारे लोकं तुला तुझ्याच घरात जाऊ देत नाही. काय गंमत आहे. तुला आता एका चांगल्या पीआर एजन्सीची गरज आहे, जे तुझ्यासाठी चांगले काही करतील. तू माझी आणि माझ्या मुलांची हिंमत तोडू शकत नाही. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे न्याय मिळतो आणि आम्हालाही लवकरच न्याय मिळेल.”

आलिया आणि नवाज यांच्या नात्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून तणाव सुरु आहे. आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना नवाजबद्दल अनेक गोष्टी दाखवत आहे. मात्र अजून नावाजकडून यावर काहीही उत्तर आलेले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

हे देखील वाचा