Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड प्रतिभावान अभिनेता असलेला नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ परदेशातील कार्यक्रमांमध्ये केले देशाचे प्रतिनिधित्व

प्रतिभावान अभिनेता असलेला नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ परदेशातील कार्यक्रमांमध्ये केले देशाचे प्रतिनिधित्व

बहुप्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली असून, यावर्षी कान्समध्ये दीपिका पादुकोण, आर माधवन, केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, प्रसून जोशी, हिना खान, ऐश्वर्या राय आदी अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. यावर्षीचा कान्स भारतासाठी अधिक खास असणार आहे, याचे कारण म्हणजे भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’साठी अधिकृत आमंत्रण देण्यात आले आहे. समारंभाची सुरुवात झाल्यानंतर मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये भारताचे प्रतिनिधी मंडळ आणि पाहुण्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय मनोरंजनविश्वातील दहा सेलिब्रिटी सामील होणार आहे.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आठवेल रॅम्पवॉक केलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यावर्षी पुन्हा या फेस्टिवलमध्ये सामील होत आहे. बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. देशासोबतच परदेशात फॅन फॉलोईंग असणाऱ्या नवाजुद्दीनने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आता तो लवकरच हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. आतापर्यंत नवाजुद्दीनने कोणकोणत्या खास प्रसंगी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले जाणून घेऊया.

अष्टपैलू अभिनेता असलेल्या नवाजुद्दीन नेहमीच त्याच्या कामाने वेगवेगळ्या उपलब्धी मिळवत असतो. एका रिपोर्ट्सनुसार नुकतेच नवाजुद्दीनचा अमेरिकी-बांग्लादेशी सिनेमा असणारा ‘नो लँड्स मॅन’ ला ‘सिडनी फिल्म फेस्टिवल’साठी निवडण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर याच कान्स फेस्टिवलमध्ये होणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या ‘किक’ सिनेमातील भूमिकेसाठी शिकागो इथे संपन्न झालेल्या साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित करण्यात आले होते. याबद्दल सांगताना तो म्हणाला होता की, हा सन्मान त्याच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ला सिंगापुर इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये लेस्ली हो एशियन फिल्म टॅलेंट अवार्डने गौरवण्यात आले होते. ही सिरीज आणि नवाजुद्दीनची भूमिका तुफान गाजली.

नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या मनोरंजनविश्वातील योगदानासाठी कार्डिफ इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन अवॉर्ड्सने सन्मानित केले गेले आहे. त्याला हा पुरस्कार ब्रिटेनच्या काउंसिल जनरल मिक एंटोनिव यांच्याकडून देण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा